Ports Minister Sarbananda Sonowal On Wadhawan Port Maharashtra : काही लोक म्हणतात की पैसा पाण्यात गेला, काही लोक म्हणतात की पाण्यासारखा पैसा खर्च केला. एकूणच काय तर पाणी आणि पैशाचे समीकरण एकमेकांशिवाय अपूर्ण आहे. मात्र केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल (Sarbananda Sonowal) यांनी पाण्यातही पैसा असल्याचे सांगितले आणि त्यामागचे गणितही समजावून सांगितले. जलमार्गाने व्यापार करणाऱ्या उद्योजकांशी बोलत असताना सोनोवाल यांनी हे विधान केले आहे. मुंबईजवळ उभ्या राहणारे वाढवण बंदर (Vadhvan Port) 2034 पर्यंत कंटेनर हाताळणी करणाऱ्या बंदरांमध्ये जगातील पहिल्या 10 क्रमांकांच्या बंदरांपैकी एक असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
डहाणूजवळ वाढवण बंदर (Wadhawan Port) पीपीपी तत्त्वावर उभारण्यात येत आहे. या बंदरामध्ये महाकास मालवाहू जहाजे येऊ शकतील. केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी म्हटले की, गेल्या 10 वर्षात जलमार्गांनी जीडीपी वाढीला मोठा हातभार लावला आहे. देशातील प्रमुख बंदरे वर्षाकाठी 820 एमटी मालवाहतूक हाताळत आहेत. 2014च्या तुलनेत ही क्षमता 47 टक्क्यांनी वाढली आहे. बंदरांची क्षमता आता 1630 एमटीपर्यंत वाढली असून भारत सरकार कांडला, पारादीप आणि तुतीकोरीन बंदरांना ग्रीन हायड्रोजन हबमध्ये (Green Hydrogen Hubs) रुपांतरीत करत आहे, असे सोनोवाल यांनी म्हटले. जहाज बांधणी व्यवसायाला बळकटी देण्यासाठी आर्थिक सहाय्याचे धोरण आखण्यात आले आहे. याचा फायदा जहाजबांधणी क्षेत्राला होत आहे. या क्षेत्राने 10,500 कोटी रुपयांच्या ऑर्डर आकर्षित केल्या असून यामुळे पुरवठा साखळीला अधिक बळ मिळालेच आहे. शिवाय रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणावर होत आहे असे सोनोवाल यांनी म्हटले.
(रोज 100 रुपये गुंतवा अन् करोडपती बना, विश्वास होत नाही तर ही बातमी नक्की वाचा)
केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी म्हटले की, 2047 पर्यंत भारतातील बंदरे वर्षाकाठी 10 हजार मेट्रिक टन मालवाहतूक हाताळू लागतील. उत्तम दर्जाची पायाभूत सुविधा, नवतंत्रज्ञान आणि वेगाने वाढीसाठी गरजेला पूरक असलेली नियामक चौकट ही बंदरांच्या क्षमता वाढीला पाठबळ देणारी ठरेल असे ते म्हणाले. फिक्कीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्र्यांनी ही माहिती दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world