- छत्तीसगढ़ के महासमुंद जिले में वर्षा जल संरक्षण के लिए जनभागीदारी से व्यापक स्तर पर जल संरचनाएं बनाई.
- मोर गांव मोर पानी 2.0 अभियान के तहत 15 दिनों में तीन लाख इकतालीस हजार जल संरक्षण संरचनाओं का निर्माण हुआ.
- पहली बारिश में करीब इकतीस करोड़ लीटर पानी संचयित हुआ जो भू-जल स्तर बढ़ाने में मदद करेगा.
काही कथा केवळ आकड्यांबाबत नसतात, तर विचार, एकजुटता आणि सातत्याच्या असतात. अशीच एक प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे. दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या हजारो गावकऱ्यांनी यंदा परिस्थिती बदलण्याचा संकल्प केला. गावागावात लोकांनी श्रमदान केलं. १५ दिवस शेत आणि जंगलात पाण्याच्या संरचना तयार केला. घरांजवळ लहान लहान खड्डे तयार केले आणि पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्याचं अभियान केलं.
परिणामी, मान्सूनच्या पहिल्याच पावसात तब्बल ३१ कोटी लीटर पाणी साठविण्यात आलं. हे केवळ जल संरक्षणाचं यश नाही तर गावकऱ्यांनी एकत्र येत एक आदर्श उदाहरण समोर ठेवलं आहे.
पाणी टंचाईमुळे जिल्ह्यांत दुष्काळासारखी स्थिती...
ही कहाणी छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातील आहे. महासमुंद जिल्हा बराच काळापासून भूजल स्तर आणि पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त होता. दरवर्षी उन्हाळ्यात जिल्ह्यातील अनेक भागात पाण्याची कमतरता गावकऱ्यांसाठी सर्वात मोठी चिंता ठरत होता. त्यामुळे जिल्ह्यात पाणी वाचविण्यासाठी जल आंदोलन उभं करण्यात आलं.
मोर गावातून घेतली प्रेरणा...
मोर गाव, मोर पाणी २.० अभियानाअंतर्गत जल संरक्षण आणि भूजल स्तर वाढविण्यासाठी एकत्रितपणे काम केलं. प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ५५१ ग्राम पंचायत आणि ११४० हून अधिक गावात विशेष अभियान चालवलं. यादरम्यान लाखो गावकऱ्यांनी स्वेच्छेने श्रमदान केलं आणि जल संरक्षणशी संबंधित कामांमध्ये भाग घेतला. गावांमध्ये पावसाचे पाणी साठवणे आणि भूजल पातळी वाढवणे हा या मोहिमेचा उद्देश होता.

१५ दिवसात ३.४१ लाख जल संरचना
१५ दिवसांच्या आत जिल्ह्यात १७ प्रकारात एकूण ३ लाख ४१ हजार जल संरक्षण संरचना तयार केल्या. यात रेन वॉटर हार्वेस्टिंग, खड्डे, लघु जल संरक्षण संरचना, सोकपित, ब्रेश वूड संरचना, यामध्ये नाल्यांवर बांधलेले जलशोषण चर वॉटर एब्जॉर्प्शन ट्रेंच (WAT), स्टॅगर्ड कंटूर ट्रेंच (SCT), कंटीन्यूअस कंटूर ट्रेंच (CCT) यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, मनरेगा आणि विविध विभागांच्या समन्वयाने तलाव, गॅबियन आणि विहिरी यांसारख्या संरचना देखील बांधण्यात आल्या.
पहिल्याच पावसात दिसलं मेहनतीचं फळ..
१४ मे ते ३० मेपर्यंत सुरू असलेल्या विशेष अभियानाचा परिणाम पहिल्या पावसापासून दिसू लागला. पाऊस उशीरा सुरू झाल्यानंतरही येथे तब्बल ३१ कोटी लीटर पाणी साठविण्यात यश आलं. आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी थेट वाहून नाला आणि नदीत जात होतं. आता हेच पाणी जमिनीत शोषूण घेतलं जात आहे. यामुळे भूजल स्तर वाढविण्यास मदत होईल.

गावकऱ्यांच्या घराजवळ खड्डे...
आरंड ग्रामपंचायतीचे रहिवासी शंकरलाल यादव यांनी सांगितलं की, ग्रामसभेत पाण्याच्या समस्येवर चर्चा झाली. त्यानंतर प्रत्येक घरात शोषखड्डा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. गावकऱ्यांनी यात सहभाग घेऊन हे काम पूर्ण केले. त्यांच्या मते, आता जवळपास प्रत्येक घरात शोषखड्डे बांधले गेले असून त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते.
गावकऱ्यांनी मिळून तयार केले लहान लहान जलस्त्रोत...
आरंड ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी कन्हैयालाल श्रीवास्तव यांचं म्हणणं आहे की, गावात पहिल्यांदा इतक्या मोठ्या पातळीवर पाणी वाचला, पाणी जिरवा अभियान चालविण्यात आलं. गावात लहान लहान खड्डे तयार करण्यात आले आणि जंगल क्षेत्रात तब्बल ४०० खड्डे तयार करण्यात आले. याशिवाय नाल्यात गोण्यांच्या मदतीने स्टॉप डॅमदेखील तयार करण्यात आले, ज्यामुळे पावसाचं पाणी जास्त काळासाठी रोखता येऊ शकेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world