What is Orange Economy : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज WAVES 2025 समिटचं उद्घाटन केलं. वेव्ह्ज हा केवळ शब्द नाही तर ही एक लाट आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचं वर्णन केलं. तसेच वेव्ह्ज हा भारतातील ऑरेंज इकॉनॉमीचा उदय असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. ग्रीन इकोनॉमी, डिजिटल इकोनॉमी ही संकल्पना अनेकांनी ऐकली असेल. मात्र अनेकांना मोदींनी उल्लेख केलेली ऑरेंज इकोनॉमी काय आहे? असा प्रश्न पडला आहे.
(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ऑरेंज इकोनॉमी कोणत्या रंगाशी जोडलेलं आर्थिक मॉडेल नाही. तर ही एक अशी अर्थव्यवस्था आहे, जी कला, संस्कृती आणि क्रिएटीव्हीटीवर आधारित आहे. सिनेमा, फॅशन, म्युझिकपासून थिएटर, डिझाईन, गेमिंग अशा विविध क्षेत्रांचा यात समावेश होतो.
ऑरेंज इकोनॉमी काय आहे?
ऑरेंज इकॉनॉमी हे नाव पारंपरिक अर्थाने क्रिएटीव्हिटीचा रंग म्हणून वापरले जाते. पूर्वी हे कला आणि संस्कृतीच्या उद्योगांवर केंद्रित होती. परंतु कालांतराने यात तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत गेला. ऑरेंज इकॉनॉमी ही एक भरभराटीची, संपत्ती निर्माण करणारी मानली जाते. ऑरेंज इकॉनॉमी ही केवळ कला किंवा मनोरंजन नाही तर ती भविष्यातील अर्थव्यवस्था आहे. यावरून हे सिद्ध होते की कला ही केवळ एक प्रदर्शनाची वस्तू नाही तर ती एक सामाजिक आणि आर्थिक शक्ती आहे.
(नक्की वाचा - ATM Withdrawal : एटीएममधून पैसे काढणे महागले; 1 मे पासून नवा नियम लागू)
पहिल्यांदा कुठे वापरला गेला शब्द?
ऑरेंज इकॉनॉमी हा शब्द पहिल्यांदा कोलंबियाचे माजी अध्यक्ष इवान ड्यूक मारक्वेज आणि कोलंबियाचे माजी सांस्कृतिक मंत्री फेलिप बुइत्रागो यांनी वापरला होता. त्यांचा असा विश्वास होता की केशरी रंग हा जगाची संस्कृती आणि क्रिएटिव्हिटीचे प्रतीक आहे.
फेलिप बुइत्रागो यांच्या मते, जेव्हा तुम्ही सिनेमा, फॅशन, म्युझिक, खेळ, डिझाइन यासारख्या गोष्टींबद्दल बोलता तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात आपल्या ओळखीबद्दल बोलत असता. हीच ऑरेंज इकॉनॉमी आहे, जिथे स्वप्न पाहणारे आणि बदल घडवणारे एकत्र काम करतात.
(नक्की वाचा- MHADA Offer : म्हाडाची 'बुक माय होम' भन्नाट ऑफर, नागरिकांना आवडेल ते घर खरेदीची संधी)
पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी काय म्हटलं?
पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, वेव्ह्ज हा भारतातील ऑरेंज इकॉनॉमीचा उदय आहे. कंटेन्ट, क्रिएटीव्हिटी आणि कल्चर हे ऑरेंज इकॉनॉमीचे तीन आधारस्तंभ आहेत. येणाऱ्या काळात भारतीतील क्रिएटीव्हिटी क्षेत्रातील इकोनॉमी भारतातील अर्थसंकल्पात मोठं योगदान देईल. आज भारत फिल्म प्रोडक्शन, डिजिटल कटेन्ट, गेमिंग, फॅशन, म्युझिकचं ग्लोबल हब बनत आहे. ऑरेन्ज इकोनॉमीच्या या वाढीत वेव्ह्जच्या मंचावरून देशातील युवा क्रिएटर्सना सांगेल की, तुम्ही सगळे भारतातील इकोनॉमीत एक लाट आणत आहात. क्रिएटीव्हिटीची ही लाट तुमची मेहनत, तुमची आवड चालवत आहे. आमचं सरकार तुमच्या प्रयत्नांमध्ये सोबत आहे, असं देखील पंतप्रधान मोदींनी म्हटलं.