
PM Modi in NDTV World Summit: नवी दिल्लीतल्या 'भारत मंडपम्' मध्ये आयोजित NDTV वर्ल्ड समिटमध्ये शुक्रवारी (17 ऑक्टोबर) संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. यावेळी त्यांनी भारताची वाढ आत्मविश्वास आणि जागतिक स्तरावरील भारताचे स्थान यावर सविस्तर चर्चा केली. याच दरम्यान, त्यांनी 'गरीबी हटाओ'च्या जुन्या घोषणेवरून काँग्रेसवर जोरदार टीका केली.
'गरीबी हटाओ'वर पंतप्रधानांची टीका
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा सर्व सरकारी धोरणांच्या मुळाशी 'सरकारीकरण' ऐवजी 'लोकतांत्रिकीकरण' असते, तेव्हा देशवासियांची मान अभिमानाने उंचावते. काँग्रेसच्या नेत्यांनी 'गरीबी हटाओ, गरीबी हटाओ' हे बोलणे सुरूच ठेवले, पण गरीबी हटली नाही.
मोदींनी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करताना सांगितले, "या [काँग्रेस] परिवाराचे भाषणे ऐका. लाल किल्ल्यावरून भाषण देणारा एकही नेता असा नसेल, ज्यांनी गरीबी हटवण्याबद्दल बोलले नसेल. पण, गरीबी कमी झाली नाही."
( नक्की वाचा : NDTV World Summit : 'नवा भारत दहशतवादासमोर गप्प बसणार नाही'; 'ऑपरेशन सिंदूर'चा दाखला देत PM मोदींनी ठणकावले )
'25 कोटी गरीब गरीबीतून बाहेर'
गरीबी निर्मूलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "गेल्या 11 वर्षांमध्ये आम्ही 25 कोटी गरीब लोकांना गरीबीच्या बाहेर काढले आहे. त्यामुळेच देशाचा आमच्यावर विश्वास आहे."
आजचा भारत आहे 'अनस्टॉपेबल'
पंतप्रधानांनी यावेळी जोर देऊन सांगितले की, "आजचा भारत 'अनस्टॉपेबल' आहे." ते म्हणाले, "आता भारतात गरीब आणि वंचितांच्या सेवेसाठी समर्पित सरकार आहे. आम्ही मागासलेल्यांना प्राधान्य देतो आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी पूर्ण संवेदनशीलतेने काम करतो. मोठ्या-मोठ्या चर्चांमध्ये या महत्त्वपूर्ण बाबीकडे अनेकदा दुर्लक्ष होते."
( नक्की वाचा : NDTV World Summit: 'ना रुकेंगे, ना थमेंगे' PM मोदींनी सांगितला Unstoppable Bharat चा प्रवास)
BSNL च्या यशावरून काँग्रेसवर हल्लाबोल
पंतप्रधान मोदींनी सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी BSNL चा उल्लेख करत काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, "काही दिवसांपूर्वी यावर चर्चा होती की BSNL ने आपला 'मेड इन इंडिया 4G टॅग' लाँच केला आहे. खरोखरच ही देशासाठी एक खूप मोठी उपलब्धी आहे."
BSNL च्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत मोदी म्हणाले, "आज आपण गर्वाने म्हणू शकतो की भारत जगातील अशा टॉप 5 देशांमध्ये समाविष्ट झाला आहे, ज्यांच्याकडे स्वतःच्या देशात तयार केलेला 4G तंत्रज्ञान आहे. हिंदुस्तानने (काँग्रेसच्या काळात) 2G, 2G हेच ऐकले आहे, म्हणून मी 4G बद्दल बोलतो तेव्हा जरा वेळ लागतो."
काँग्रेसवर टीकास्त्र सोडताना ते पुढे म्हणाले, "काँग्रेसने सरकारी कंपनी BSNL ला बर्बाद करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, पण आज BSNL नवीन यश संपादन करत आहे."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world