Video: एअरपोर्टवर महागडं फूड घेऊ नका.., बाईनं काय दिमाग लावला,एका आयडियाने खाऊही मिळालं अन् पैशांचीही झाली बचत

Woman Airport Viral Video :  दिल्ली एअरपोर्ट टर्मिनल वन (T1) कडे जात असताना एका प्रवासी महिलेनं महागड्या फूडपासून पैशांची बचत करण्यासाठी भन्नाट आयडिया केली. महिला प्रवाशाचा व्हिडीओ झालाय व्हायरल.

जाहिरात
Read Time: 2 mins
Woman And Blinkit Agent Viral Video
मुंबई:

Woman Airport Viral Video :  दिल्ली एअरपोर्ट टर्मिनल वन (T1) कडे जात असताना एका प्रवासी महिलेनं महागड्या फूडपासून पैशांची बचत करण्यासाठी भन्नाट आयडिया केली. तिने फ्लाईटच्या आधी आवश्यक सामान आणि स्नॅक्ससाठी ब्लिंकिट (Blinkit) वर ऑर्डर केलं. जे फक्त 10 ते 15 मिनिटात एअरपोर्टच्या आत डिलिव्हर झालं. महिलेची ही जबरदस्त ट्रीक प्रवाशांसाठी एक सोपं, वेगवान आणि चांगला विकल्प ठरू शकते.

एअरपोर्टवर नेहमीच लांबचा रस्ता, बिझी टर्मिनल्स आणि सर्वात जास्त महागडं स्नॅक्स असतं. पण जर तुम्ही चुकून तुमचं फूड विसरलात, तर तुम्हाला तिथे खरेदी करून खावं लागतं. जे खूप महागडं ठरतं आणि अनेकांना परवडणारं नसतं. दिल्ली एअरपोर्टच्या टर्मिनल एकवर लेओवर दरम्यान या महिलेनं फ्लाईटच्या आधी गरजेचं सामान घेण्याचा सोपा उपाय शोधला.

त्यानंतर जे झालं..त्या गोष्टीकडे सोशल मीडियावर अनेकांनी लक्ष वेधलं आहे. महिला प्रवाशाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, तुम्ही एअरपोर्टवर 1000 रुपयांचे स्नॅक्स खरेदी करण्यापासून वाचले. कारण तुम्हाला आताच समजलं की, तुम्ही दिल्ली एअरपोर्टच्या आतमध्येही ब्लिंकिटने ऑर्डर करू शकता.

नक्की वाचा >> ब्राम्हण समाजाबाबत आक्षेपार्ह विधान करणारी महिला कॉन्स्टेबल सस्पेंड! 'तो' Video झाला होता व्हायरल

ब्लिकिंटने (Blinkit) ने केली एअरपोर्ट डिलिव्हरी

या व्हायरल पोस्टमध्ये महिला प्रवाशाने म्हटलंय, मी ग्वालियरहून सिंगापूरला जात होती. दिल्ली एअरपोर्ट टर्मिनल 1 कडे माझं काही तासांचं लेओवर होतं. मी टर्मिनल वर जशी पोहोचली, मला कळलं की मी माझे स्नॅक्स आणि पर्सनल केअरच्या गोष्टी पॅक करणं विसरले. माझी फ्लाईट रात्री होती. तेव्हा मी विचार केला की, ब्लिकिंटने ऑर्डर करू शकते. मी बाहेर येऊन ब्लिकिंट अॅपवर माझं करन्ट लोकेशन टाकलं. त्यानंतर ब्लिकिंट ऑर्डर घेऊन थेट एअरपोर्टच्या आतमध्ये आलं. 10-15 मिनिटांच्या आत मला माझ्या आवश्यक सर्व गोष्टी मिळाल्या.

Advertisement

नक्की वाचा >> मन्नत मध्ये आहे जन्नत! शाहरुख खानच्या बंगल्यातील Inside नजारा पाहून रजत बेदी थक्क, थेट फोटोच केले व्हायरल

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओता सहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसच नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका यूजरने म्हटलंय, भारतातील या डिलिव्हरी सेवा खूप पसंत आहेत. 15-20 मिनिटांत तुम्ही काहीही ऑर्डर करू शकता. दुसऱ्या यूजरने म्हटलं, स्नॅक्स पॅक करायची गरज काय..जेव्हा ब्लिंकिट तुमच्यासोबत आहे. एका व्यक्तीने मजेशीर कमेंट करत म्हटलं, आता एअरपोर्टवर विचारावं लागणार नाही की, हे दहा रुपयांचं बिस्किटचं पॅकेट किती रुपयांचं आहे.

Advertisement