MP Female Police Officer Video Viral : मध्य प्रदेशच्या सीधी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली होती. एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने ब्राम्हण समाजाविषयी आक्षेपार्ह टीप्पणी केली होती. संजू देवी जायसवाल असं या महिला पोलीस कॉन्स्टेबलचं नाव असून पोलीस अधीक्षक संतोष कोरी यांनी संजू देवी यांना तत्काळ निलंबीत केलं आहे. व्हायरल व्हिडीओच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली होती. अंजू देवी ऑन ड्युटी असताना त्यांनी ब्राम्हण समाजाबाबत चुकीचं वक्तव्य केलं होतं. ही घटना 24 ऑक्टोबर घडली होती.
शहरातील एका शाळेत गायिका शहनाज अख्तर यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी अंजू देवी यांची ड्युटी लावण्यात आली होती. कार्यक्रमादरम्यान त्यांनी ब्राम्हण समजाविषयी अभद्र आणि आक्षेपार्ह शब्दांचा उल्लेख केला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं आणि सोशल मीडियावर व्हायरल झालं.
पोलीस अधीक्षक संतोष कोरी यांनी तातडीनं घेतली दखल
दरम्यान, ब्राम्हण समाजाच्या संघटनांनी सोशल मीडियावर महिला कॉन्स्टेबलच्या वागणुकीबाबत सवाल उपस्थित केले होते. त्यानंतर सीधी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी तातडीनं कारवाईची मागणी केली होती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी माहिती घेत पोलीस अधीक्षक संतोष कोरी यांनी पुढील तपास सुरु केला. तपासादरम्यान, स्पष्ट झालं की, ड्युटी दरम्यान महिला कॉन्स्टेबलने ऑन ड्युटी असताना असभ वर्तन करून पोलीस विभागावर गरिमा खराब केली.
A woman police constable has been suspended for making obscene remarks against Brahmins. Sidhi Superintendent of Police Santosh Kori issued the suspension order against the policewoman: Sidhi Police pic.twitter.com/XUFBQFLdd2
— IANS (@ians_india) October 26, 2025
नक्की वाचा >> Video: देशासाठी कोहलीनं पुन्हा केलं 'विराट'काम! मैदानात दाखवली खरी देशभक्ती,ड्रेसिंग रुममध्ये जाताना जे केलं..
एसपी कोरी यांनी दिले निलंबनाचे आदेश
महिला कॉन्स्टेबल अंजू देवी जायसवाल यांना 25 ऑक्टोबरला निलंबीत करण्यात आलं. निलंबनाच्या कालावधीत त्यांचं मुख्यालय रक्षित केंद्र आणि सीधी जिल्हा निर्धारित करण्यात आलं आहे. यादरम्यान त्यांना नियमानुसार, जीवन-निर्वाह भत्ता देण्यात येईल. पण त्या पोलीस अधीक्षक यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू शकत नाहीत. अंजू देवी यांना त्यांची उपस्थिती नियमितपणे नोंदवावी लागेल. एसपी कोरी यांनी आदेशात म्हटलंय की, ड्युटीदरम्यान अशाप्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाहीय. यामुळे पोलीस खात्याची गरिमा खराब होते आणि जनतेचा विश्वासही कमी होतो.
नक्की वाचा >> Crime News : ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळाडूंची भररस्त्यात छेड काढली! रडत रडत टीम मॅनेजमेंटला सांगितलं,पोलिसांनी CCTV पाहताच..
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world