
बेंगळुरु: तंत्र मंत्र आणि अंधश्रद्धेतून मनुष्याचा जीव घेतल्याच्या, नरबळी दिल्याच्या बातम्या अनेकदा ऐकल्या असतील. मात्र बेंगळुरुमधून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. बेंगळुरूच्या महादेवपुरातील चिन्नप्पा लेआउट येथील एकमे बॅलेट अपार्टमेंटमध्ये एका महिलेने तिच्या पाळीव कुत्र्याला मंत्र-मंत्र करुन मारल्याचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
(नक्की वाचा : Kalyan : कल्याणमध्ये अडीच वर्षाच्या मुलाला पळवण्याचा प्रयत्न, आईच्या समोरच घडला थरारक प्रकार! )
समोर आलेल्या माहितीनुसार, त्रिपर्णा पायक असं या महिलेचे नाव असून ती मूळची पश्चिम बंगालची रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. त्रिपर्णा हिने चार दिवसांपूर्वी तिच्या घरात पाळलेल्या लॅब्राडोर जातीच्या कुत्र्याचा गळा दाबून खून केला. यानंतर तिने मृतदेह कापडात गुंडाळला आणि अपार्टमेंटमध्ये बंद केला आणि सर्व खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे सील केले. काही दिवसांनंतर, अपार्टमेंटच्या परिसरात तीव्र दुर्गंधी पसरू लागल्यावर, रहिवाशांनी बीबीएमपी (बृहत बेंगळुरू महानगरपालिका) ला कळवले. जेव्हा अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि फ्लॅटचा दरवाजा उघडला तेव्हा आतील भयानक दृश्य समोर आले.
अधिकाऱ्यांना कुत्र्याचा कुजलेला मृतदेह आढळला, त्याच्या आजूबाजूला सापडलेल्या वस्तू काळ्या जादू केल्याचे दर्शवत होत्या. खोलीत अनेक धार्मिक चित्रे देखील आढळली, ज्यावरून तिथे काही प्रकारची पूजा किंवा तांत्रिक विधी केला जात होता. तक्रारदार डॉ. रुद्रेश कुमार म्हणाले की, घरात दोन कुत्रे जिवंत आढळले, ज्यांवर बीएमपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणि मृत कुत्र्याची मान कापण्यात आली होती, आता या ताज्या घटनेने इतर पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
(नक्की वाचा- Dombivli : डोंबिवलीच्या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये सापडले 2 कोटींचे ड्रग्ज! घर पाहून पोलीसही हादरले)
दरम्यान, मृत कुत्र्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हे स्पष्ट झाले आहे की त्याचा मृत्यू सुमारे चार दिवसांपूर्वी झाला होता. पोलिसांनी महादेवपुरा पोलिस ठाण्यात प्राणी क्रूरता आणि संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या, हत्येचे कारण तंत्र-मंत्र होते की महिलेची मानसिक स्थिती यासाठी जबाबदार आहे याचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरातील प्राण्यांच्या हक्कांवर आणि पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सोशल मीडियावर प्राणीप्रेमींचा रोष उफाळून आला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world