पूर्वांचल विद्यापीठात सर्वांनाच धक्का देणारी एक घटना समोर आली आहे. यात फार्मसीच्या पहिल्या वर्षाला असलेल्या चार विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तर पत्रिकेत 'जय श्रीराम' आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची नावे लिहीली होती. तरीही हे विद्यार्थी उतीर्ण झाले. ते विद्यार्थी नुसते उत्तीर्ण झाले नाहीत तर त्यांना 56 टक्के गुणही मिळाले. मात्र एका माजी विद्यार्थ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा
दिव्याशू सिंह हा पूर्वांच विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे. विद्यापिठात फार्मसीमध्ये शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी परिक्षेत चुकीची उत्तरे लिहूनही ते पास झाल्याची बाब त्याला समजली. याबाबत त्याने माहिती अधिकारात विद्यापीठाकडून संबधिक माहिती मागवली होती. त्यात त्याने काही रोलनंबरच्या उत्तर पत्रिकांची पुन:तपासणीची मागणी केली. त्यातील चार जणांच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी फक्त 'जय श्रीराम' असे लिहीले होते. शिवाय विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दीक पंड्या या खेळाडूंसह इतर खेळाडूंच्याही नावाचा उल्लेख केला होता. उत्तरपत्रिकेत असे लिहून त्यांना 75 पैकी 42 मार्क्स मिळाले होते हे विशेष. त्यांना मिळालेल्या गुणांची टक्केवारीही 56 टक्के होती. ऑगस्ट 2023 मध्ये हा प्रकार उघड झाला.
हेही वाचा - अति घाई संकटात नेई! अमेरिकेत गुजरातच्या 3 महिलांचा मृत्यू, हवेत 20 फुट उंच उडाली कार
ही बाब स्पष्ट झाल्यानंतर पैसे घेऊन विद्यार्थ्यांना प्राध्यापकांनी उत्तीर्ण केल्याचा आरोप माजी विद्यार्थ्याने केला. याबाबतची तक्रार त्यांनी राज्यपालांकडे ही केली. याची दखल घेत राज्यपालांनी 21 डिसेंबर 2023 ला या संपुर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. महाविद्यालयाने चौकशी समिती स्थापन केली. शिवाय बाहेरच्या परिक्षकांकडून संबधीत विद्यार्थ्यांचे पेपर पुन्हा तपासण्यात आले. त्यावेळी या सर्व विद्यार्थ्यांना शुन्य गुण मिळाले. शिवाय चौकशी समितीने या प्रकरणी एक अहवाल कुलपतींना सादर केला. त्यात त्यांनी दोन प्राध्यापकांना दोषी ठरवले. या प्रकरणी कुलपती डॉ. वंदना सिंह यांनी डॉ. आशुतोष गुप्ता आणि डॉ. विनय वर्मा यांना दोषी ठरवत त्यांना कार्यमुक्त केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world