कोविड XEC ने टेन्शन वाढवलं, 27 देशांमध्ये फैलाव; काय आहेत लक्षणे?

Covid 19 XEC variant spread: XEC संसर्गाची लक्षणे पूर्वीच्या COVID-19 प्रकारांसारखीच आहेत. ज्यामध्ये ताप, घसा खवखवणे, खोकला, वास न लागणे, भूक न लागणे आणि अंगदुखी यांचा समावेश होतो.

जाहिरात
Read Time: 2 mins
Covid China Connection: वैज्ञानिकों के नये अध्य्यन में दावा किया गया है कि चीन के वुहान शहर के बाजार से कोविड फैला था.

Covid XEC variant spread:

कोरोनाने पुन्हा एकदा जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट XEC चा जगभरात वेगाने प्रसार होत आहे. शास्त्रज्ञांनी या व्हेरिएंटच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. शास्त्रज्ञांना असं वाटतंय की या नव्या व्हेरिएंटमध्ये Covid 19 चा प्रमुख स्ट्रेन बनण्याची क्षमता आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोरोनाचा XEC प्रकार जूनमध्ये जर्मनीमध्ये प्रथम आढळला. तेव्हापासून युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, डेन्मार्क आणि इतर युरोपीय देशांमध्ये याचे रुग्ण आढळून आले. सध्या डेन्मार्क आणि जर्मनीमध्ये XEC 16-17 टक्के आहे. यूके आणि नेदरलँड्समध्ये सुमारे 11-13 टक्के केसेस आहेत. 

द इंडिपेंडंटच्या अहवालानुसार, आतापर्यंत पोलंड, नॉर्वे, लक्झेंबर्ग, युक्रेन, पोर्तुगाल आणि चीनसह 27 देशांतील 500 नमुन्यांमध्ये XEC आढळले आहे. XEC व्हेरिएंट अद्याप नवीन आहे, त्यामुळे शास्त्रज्ञांना देखील याबद्दल जास्त माहिती नाही. हा प्रकार ओमिक्रॉन स्ट्रेनचा सब व्हेरिएंट आहे. तर KS.1.1 आणि KP.3.3 यांचा हायब्रिड प्रकार आहे. तज्ज्ञांचा म्हणणं आहे की,  दुसऱ्या लहरीनंतर उदयास आलेल्या इतर प्रकारांपेक्षा अधिक संसर्गजन्य बनवू शकतो.

(नक्की वाचा -  भाजपचा अंतर्गत सर्वे, पक्षानं घेतला धसका? चाणक्य मैदानात उतरणार)

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोविड-19 चा प्रसार होण्याचे मुख्य कारण ओमिक्रॉन आणि त्याचे उप प्रकार आहेत. XEC प्रकार हा देखील याचाच एक प्रकार आहे. ओमिक्रॉनच्या सर्व प्रकारांमध्ये संसर्गजन्यता जास्त असल्याचे दिसून आली आहे. परंतु यामुळे गंभीर आजारांचा धोका कमी आहे. अशा परिस्थितीत या नवीन प्रकारामुळे धोकाही कमी होणे अपेक्षित आहे.

Advertisement

(नक्की वाचा - 'सिल्लोड आहे की पाकिस्तान , इथं राहायचं की...' दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य, वाद पेटणार?)

XEC ची लक्षणे

XEC संसर्गाची लक्षणे पूर्वीच्या COVID-19 प्रकारांसारखीच आहेत. ज्यामध्ये ताप, घसा खवखवणे, खोकला, वास न लागणे, भूक न लागणे आणि अंगदुखी यांचा समावेश होतो. संशोधक XEC ची वैशिष्ट्ये आणि संभाव्य प्रभाव अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्याचे बारकाईने निरीक्षण करत आहेत.