
राम शिंदे, प्रतिनिधी
अनिल अंबानी यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) चौकशी केली जात आहे. ही चौकशी 17 हजार कोटींच्या बँक लोन फ्रॉड प्रकरणात करण्यात येत आहे. अनिल अंबानी यांच्या अनेक कंपन्यांवर बनावट बँक गॅरेंटी, शेल कंपन्यांद्वारे निधी हस्तांतरण आणि कर्जाची चुकीची मंजुरी असे गंभीर आरोप आहेत.
यापूर्वी ईडी या प्रकरणात 35 हून अधिक ठिकाणी, 50 कंपन्या आणि 25 हून अधिक जणांकडे तीन दिवसांपर्यंत छापेमारी केली होती. यादरम्यान मोठ्या संख्येत कागदपत्र आणि डिजिटल पुरावे सापडले होते. आज चौकशीदरम्यान ईडीला अनिल अंबानी यांच्याकडून नेमकी कोणती माहिती अपेक्षित आहे? ईडीकडून अनिल अंबानी यांना कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात? जाणून घेऊया.
ही आहे प्रश्नांची यादी....
१. गेल्या १० वर्षात तुमच्या कोणत्या कंपन्यांनी बँकांकडून कर्ज घेतले आणि किती कर्ज घेतले.?
२. कर्ज घेताना तुमच्या कंपन्यांची आर्थिक स्थिती काय होती? बॅलन्स शीट आणि प्रोजेक्शन कागदपत्रे बरोबर होती का?
३. तुम्ही सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता कशी पडताळायची? तुम्ही जाणूनबुजून चुकीची माहिती दिली का?
४. ज्या उद्देशाने कर्ज मंजुरी घेतली होती, त्याच उद्देशासाठी कर्ज वापरले होते का? जर नसेल, तर तुम्ही कोणाला जबाबदार धरता?
५. कर्जाची रक्कम इतर कोणत्याही फर्म, शेल कंपनी किंवा वैयक्तिक खात्यात हस्तांतरित केली होती का?
६. तुमच्या कंपन्यांनी जाणूनबुजून कर्ज चुकवले किंवा कर्ज परतफेड करण्याचे टाळले?
७. तुमच्या कंपन्यांनी केलेल्या बनावट गुंतवणूक किंवा बिलिंगचा उद्देश काय होता? तो पैसा परदेशात पाठवला होता का?
८. कॅग, आरबीआय किंवा बँकांनी तुमच्याविरुद्ध कोणताही ऑडिट अहवाल तयार केला होता का? जर हो, तर तुमचे उत्तर काय होते?
९. बँकांना फसवण्याच्या कोणत्याही योजनेत किंवा कटात तुम्ही जाणूनबुजून भाग घेतला होता का?
१०. काही वरिष्ठ अधिकारी (जसे की अमिताभ झुनझुनवाला, सतीश सेठ इत्यादी) तुमच्या निर्देशांवर काम करत होते हे खरे आहे का?
११. तुमच्या कंपन्यांनी कोणत्या परदेशी कंपन्यांशी व्यवहार केले आणि पैसे तिथे हस्तांतरित केले गेले का?
१२. तुम्ही कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला किंवा बँक व्यवस्थापनाला प्रभावित करण्यासाठी कोणत्याही प्रकारची लॉबिंग किंवा लाच दिली का?
१३. तुमच्या कंपन्यांना एनपीए (नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स) घोषित केल्यानंतरही जाणूनबुजून निधी हस्तांतरित करणे सुरू ठेवले का?
१४. तुम्ही राजकीय पक्षांना, ट्रस्टला किंवा संस्थांना संशयास्पद निधी दान केला का?
१५. बनावट बँक हमी देण्याची गरज का होती, त्या बदल्यात हमीदाराला किती पैसे दिले गेले?
१६. तुमच्या बँक खात्यांबद्दल किंवा देशाबाहेरील कंपन्यांबद्दल माहिती द्या?
१७. कर्ज मंजूर होण्यापूर्वी पैसे तुमच्या कंपनीच्या खात्यात कसे पोहोचले?
१८. कर्ज मंजूर होताच तुमच्या वतीने बँक अधिकाऱ्यांना पैसे का देण्यात आले?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world