जाहिरात

UN Council: 'सुरक्षेवर उपदेश देण्याचा अधिकारी नाही..', भारताने UNमध्ये पाकला फटकारले

अनेक दशकांपासून भारत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांना तोंड देत आहे, अशा शब्दात भारतीय प्रतिनिधींनी पाकची पोलखोल केली. 

UN Council: 'सुरक्षेवर उपदेश देण्याचा अधिकारी नाही..', भारताने UNमध्ये पाकला फटकारले

भारताने शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला चांगलेच खडेबोल सुनावले.26/11 च्या मुंबई हल्ल्यापासून ते गेल्या महिन्यात पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांच्या "क्रूर सामूहिक हत्येपर्यंत" अनेक दशकांपासून भारत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांना तोंड देत आहे, अशा शब्दात भारतीय प्रतिनिधींनी पाकची पोलखोल केली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेदरम्यान निवेदन देताना संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पार्वतानेनी हरीश यांनी पाकिस्तानचा बुरखा फाडला. "पाकिस्तानच्या प्रतिनिधीने अनेक मुद्द्यांवर केलेल्या निराधार आरोपांना मला उत्तर देण्यास भाग पाडले जात आहे. "भारताने गेल्या अनेक दशकांपासून आपल्या सीमेवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांचा सामना केला आहे. यामध्ये मुंबई शहरावरील 26/11 च्या भयानक हल्ल्यापासून ते एप्रिल 2025 मध्ये पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांच्या क्रूर सामूहिक हत्येपर्यंतचा समावेश आहे., असं ते म्हणाले.

तसेच  पाकिस्तानी दहशतवादाचे बळी प्रामुख्याने नागरिक आहेत, कारण त्यांचे उद्दिष्ट आपल्या समृद्धी, प्रगती आणि मनोबलावर हल्ला करणे आहे. अशा देशाने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेवरील चर्चेत भाग घेणे हे आंतरराष्ट्रीय समुदायाचा अपमान आहे, असेही हरीश यांनी म्हटले आहे. 

( नक्की वाचा :  MHADA Lottery : म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीतील घरांची किंमत झाली कमी! वाचा किती होणार तुमचा फायदा? )

दहशतवादाला चालना देण्यासाठी पाकिस्तानने वारंवार नागरिकांचा ढाल म्हणून वापर केला आहे. आम्ही अलिकडेच ऑपरेशन सिंदूरमध्ये लक्ष्य झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात वरिष्ठ पाकिस्तानी सरकार, पोलिस आणि लष्करी अधिकारी उपस्थित असल्याचे पाहिले. जो देश दहशतवादी आणि नागरिकांमध्ये फरक करत नाही त्याला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात या परिषदेत हरीश यांनी पाकिस्तानच्या दहशतवादाचा बुरखा फाडला. 

दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढलाआहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने 6 मे रोजी रात्री ऑपरेशन सिंदूर अंतर्गत अचूक हल्ल्यांद्वारे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर लगेचच पाकिस्तानने 8,9 आणि 10 मे रोजी भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com