Zomato CEO Deepinder Goyal Temple Device: झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल ‘The Figuring Out' या पॉडकास्टमध्ये सहभागी झाले, तेव्हा उद्योजकता, मार्केटिंग आणि बिझनेस यासारख्या विषयांवर त्यांनी चर्चा केली. पण सोशल मीडियावर दीपिंदर गोयल यांच्याबाबत वेगळीच चर्चा रंगलीय. त्यांच्या डोळ्याजवळ लावलेल्या एका छोट्या आकाराच्या चंदेरी रंगाच्या डिव्हाइस प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आणि हे डिव्हाइस नेमकं आहे तरी काय? असा प्रश्न त्यांच्या मनात डोकावू लागला.
'Temple' डिव्हाइस नेमकं काय काम करतं? (What Is ‘Temple' and Why It Matters)
दीपिंदर गोयल यांच्या कपाळावर दिसणाऱ्या डिव्हाइसचे नाव टेम्पल (Temple) असे आहे, जे एक एक्सपेरिमेंटल हेल्थ-टेक वेअरेबल आहे. रिअल टाइममध्ये मेंदूतील रक्तप्रवाहाच्या प्रक्रियेची नोंद ठेवण्याचे काम हे डिव्हाइस करते. दीपिंदर गोयल यांनी डिसेंबर 2025 मध्ये याबाबतचे संकेत दिले होते. LinkedIn वरील पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की हे डिव्हाइस त्यांच्या 'ग्रॅव्हिटी एजिंग हायपोथेसिस' ‘Gravity Ageing Hypothesis' या रीसर्चशी संबंधित आहे. या संशोधनामध्ये वाढते वय, न्युरोलॉजी आणि गुरुत्वाकर्षण (Gravity) यांच्यातील नातं समजून घेण्याचा प्रयत्न ते करतायेत.
(नक्की वाचा: 15 Kg Silver Slab Viral Video: बटाटा-टोमॅटोप्रमाणे 15 Kg चांदीच्या स्लॅबची होतेय विक्री, रस्त्यावर लावले स्टॉल)
मेंदू, ताणतणाव आणि दीर्घायुष्याची किल्ली? (Zomato CEO Deepinder Goyal)
गोयल यांच्या मते, मेंदूतील रक्तप्रवाह हा वय, स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता (Cognition) यांचा एक महत्त्वाचा बायोमार्कर मानला जातो. Temple सारख्या डिव्हाइसद्वारे दैनंदिन जीवनात एकाग्रता, ताणतणाव, झोप आणि मानसिक थकवा याबाबत सखोल माहिती मिळू शकते.
हे एक वजनाने हलके, दैनंदिन वापरासाठीचे डिव्हाइस असून त्यामध्ये AI-आधारित डेटा विश्लेषण सुविधा उपलब्ध असण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. पण हे डिव्हाइस कधी लाँच करण्यात येणार आहे, त्याची किंमत किंवा रेग्युलेटरी मंजुरीशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
(नक्की वाचा: Viral Video: भारत पर्यटनासाठी फ्रान्सहून आली, रिक्षाचालकावर प्रेम जडलं; दोघांची नियतीने अशी परीक्षा घेतली अन्...)
दुसरीकडे फुड टेक उद्योजक इतक्या शांतपणे हेल्थ टेक क्षेत्रात इतक्या शांतपणे पाऊल ठेवत असल्याचे पहिल्यांदाच पाहायला मिळतंय. तसेच Temple डिव्हाइस हे देखील दाखवून देते की भारतातील स्टार्टअप लीडर्स आता फक्त बिझनेसपुरते मर्यादित न राहता मानवी आरोग्य आणि आयुष्याकडेही नव्या दृष्टिकोनातून पाहू लागले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
