जाहिरात

VIDEO : दारुच्या नशेत लावली नको ती पैज, जिंकलाही पण नंतर घडलं भलतंच...

सबरीश असं 32 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्वांनी मद्यपान केलं होतं. दारुच्या नशेत असलेल्या सबरीशला त्याच्या मित्रांनी उकसवलं.  यानंतर तो आव्हान स्वीकारण्यास तयार झाला. 

man died after sat on powerful firecracker

दिवाळीत मित्रांसोबत पैज लावणे तरुणाच्या चांगलच जीवावर बेतलं आहे. दिवाळीच्या रात्री फटाक्यांवर बसण्याची पैज एका तरुणाने मित्रासोबत लावली आहे. बदल्यात रिक्षाची पैज लागली होती. तरुणाचं नसतं धाडसामुळे तरुणाचा मृत्यू झाला. बंगळुरूमधील या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.  

सबरीश असं 32 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्वांनी मद्यपान केलं होतं. दारुच्या नशेत असलेल्या सबरीशला त्याच्या मित्रांनी उकसवलं.  यानंतर तो आव्हान स्वीकारण्यास तयार झाला. 

 (नक्की वाचा-  भिंतीमधून पडत होतं AC चं पाणी, चरणामृत समजून पिण्यासाठी झाली गर्दी, प्रसिद्ध मंदिरातील Video Viral)

पैज अशी होती की जो फटाक्याच्या कार्डबोर्ड बॉक्सवर बसेल ज्याच्या खाली एक शक्तिशाली फटाका लावला जाईल, त्याला नवीन ऑटोरिक्षा मिळेल. घटनेच्या व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यात दिसतंय की, सबरीश एका आयताकृती बॉक्सवर बसलेला आहे. त्याच्या मित्रांनी त्याला घेरले होते. त्यापैकी एकाने फटका पेटवला, त्यानंतर सर्वजण तेथून दूर झाले. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मात्र सबरीश एकटाच त्या फटाक्यावर बसून होता. काही सेकंदात फटाका फुटला आणि सर्वत्र धूर पसरला. सबरीश फटाक्याच्या दणक्याने जमिनीवर पडला. त्याचे लगेचच त्याच्या दिशेने धावत आहे. 

( नक्की वाचा : जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे उघडले, मंदिरातील 22 पायऱ्यांचं रहस्य माहिती आहे का? )

मिळालेल्या माहितीनुसार, फटाक्यच्या स्फोटाने सबरीशच्या अंतर्गत अवयवांना इजा झाली. याप्रकरणी दोषींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत सहभागी असलेल्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com