जाहिरात

Navpancham Yog: 10 ऑगस्टला मंगळ यममुळे जुळून येणार शक्तिशाली नवपंचम योग, या 3 राशींचे येणार अच्छे दिन

Navpancham Yog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 10 ऑगस्ट रोजी मंगळ आणि यम एकमेकांपासून 120 अंशांवर असतील, ज्यामुळे नवपंचम योग जुळून येत आहे. नवपंचम योगमुळे तीन राशींचे भाग्य बदलणार आहे, वाचा सविस्तर माहिती...

Navpancham Yog: 10 ऑगस्टला मंगळ यममुळे जुळून येणार शक्तिशाली नवपंचम योग, या 3 राशींचे येणार अच्छे दिन
"Navpancham Yog In Kundali: नवपंचम योग कधी जुळून येणार आहे?"

Navpancham Yog Benefits: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जवळपास 45 दिवसांत ग्रहांचा सेनापती अशी ओळख असणारा मंगळ ग्रह आपली राशी बदलतो. यामुळे संपूर्ण जगावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतात. यावेळेस मंगळ कन्या राशीमध्ये प्रवेश करत आहे. यानुसार शनी ग्रहासोबत समसप्तक योग आणि कुंभाशी षडाष्टक योग तयार होत आहे. काही लोकांना याचा विशेष फायदा होऊ शकतो. 10 ऑगस्ट रोजी पहाटे 4:38 वाजता मंगळ ग्रह आणि यम ग्रह एकमेकांपासून 120 अंशांवर असतील. यामुळे शक्तिशाली नवपंचम राजयोग (Navpancham Yog) निर्माण होईल. कोणकोणत्या राशींना या योगमुळे फायदा होणार आहे, जाणून घेऊया माहिती... 

मेष रास | Aries Zodiac

मेष राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि यम ग्रह यांच्यामुळे जुळून आलेला योग अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या लोकांचे प्रलंबित काम पूर्ण होईल. सोबतच महागड्या वस्तू मिळू शकतात. आरोग्य चांगले राहील. आर्थिक बाबतीत यश मिळू शकते. या राशीच्या लोकांना कुटुंबासोबत वेळ घालवता येईल. तुम्ही तुमच्या स्पर्धकांना तगडी स्पर्धा द्याल. तुमचा आदर वाढ होण्याची शक्यता आहे. जीवनात आनंद येईल आणि तुम्हाला तुमच्या कामात चांगले परिणाम पाहायला मिळतील.  

Shravan 2025 Horoscope:श्रावण महिन्याचे राशीभविष्य! नोकरी, व्यवसाय, आर्थिक जीवन कसे असेल? जाणून घ्या उपाय

(नक्की वाचा: Shravan 2025 Horoscope:श्रावण महिन्याचे राशीभविष्य! नोकरी, व्यवसाय, आर्थिक जीवन कसे असेल? जाणून घ्या उपाय)

कर्क रास | Cancer Zodiac

कर्क राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग अनुकूल ठरू शकतो. या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होईल. यासोबतच कामातही फायदा होईल. या लोकांची प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. प्रवासाशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. जर तुमच्या मुलांकडून काही समस्या असतील तर त्या संपुष्टात येतील. यादरम्यान तुम्हाला प्रेम देखील मिळू शकते. मंगळावरही शनीची दृष्टी आहे, ज्यामुळे काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मित्रांशी चांगले संबंध राहतील आणि चांगली बातमी मिळू शकते.

वृश्चिक रास | Scorpio Zodiac  

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि यम ग्रह यांच्यामुळे जुळून आलेला योग फलदायी ठरेल. या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात यश मिळेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच व्यवसायातही भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. शत्रूंवर विजय मिळण्याची आणि मित्रांकडून लाभ मिळण्याचे योग आहेत. तुम्हाला कामात यश मिळेल आणि आत्मविश्वासही वाढेल.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com