जाहिरात

PAN Card: सावधान! तुमचंही पॅन कार्ड 31 डिसेंबरला कायमचं बंद होणार आहे का? समस्या टाळण्यासाठी वाचा उपाय

PAN Card: पॅन कार्ड कायमस्वरुपी बंद झाल्यास ITR प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला परतावाही मिळणार नाही.  

PAN Card: सावधान! तुमचंही पॅन कार्ड 31 डिसेंबरला कायमचं बंद होणार आहे का? समस्या टाळण्यासाठी वाचा उपाय
"Aadhaar PAN Link Deadline: तुमचंही पॅन कार्ड बंद होणार आहे का?"

PAN Card: देशभरात लाखो लोकांचे पॅन म्हणजे परमनंट अकाउंट नंबर (Permanent Account Number) 1 जानेवारी 2026पासून काम करणार नाहीय. 31 डिसेंबर 2025रोजी रात्रीपर्यंत लाखो पॅन कार्ड बंद होऊ शकतात. ज्या लोकांचे पॅन कार्ड बंद होईल, त्यांच्या महत्त्वाच्या कामांना ब्रेक लागणार आहे. कारण पॅन कार्ड आधार कार्डशी जोडणी करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. ज्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही, त्यांचे पॅन कार्ड वर्षाअखेरीस निष्क्रिय होणार आहे.

3 एप्रिल 2025 रोजी आयकर विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत सांगण्यात आले होते की, ज्यांना 1 ऑक्टोबर 2024 नंतर पॅन कार्ड मिळालंय, त्यांनी या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंत पॅन आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.

किती दंड भरावा लागेल?

पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणीची अंतिम तारीख 31 मे 2024 होती. तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत पॅन आधारशी लिंक करणार असाल तर 1 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास तुम्हाला कित्येक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

PAN-Aadhaar Link: तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नाही? घरबसल्या काही मिनिटांत करा लिंक आणि चेक करा स्टेटस

(नक्की वाचा: PAN-Aadhaar Link: तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नाही? घरबसल्या काही मिनिटांत करा लिंक आणि चेक करा स्टेटस)

पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास काय होईल?

  • जर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय झालं तर तुम्ही अधिकाऱ्यांसमोर अडचणीत येऊ शकता. पॅन कार्ड हे सर्व आर्थिक कामांसाठी आवश्यक कागदपत्र आहे.  
  • ITR भरताना तसेच आयकर परतावा मिळताना अडचणी निर्माण होऊ शकतात. 
  • नवीन पॅन कार्ड घेण्यासाठी मोठ्या प्रक्रियेचा सामना करावा लागेल. 
  • पॅन-आधार कार्ड लिंक नसेल तर टीडीएस आणि टीसीएस जास्त प्रमाणात भरावा लागू शकतो. 
  • फॉर्म 26 एएसचाही उपयोग करू शकणार नाही. 
  • टीसीएस/टीडीएस सर्टिफिकेटही उपलब्ध होणार नाही. 
  • बँक खाते उघडू शकणार नाही. क्रेडिट/डेबिट कार्ड घेऊ शकणार नाही. 
  • बँक खात्यात 50,000 रुपयांहून अधिक रक्कम जमा करू शकणार नाही किंवा 10,000 रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार करता येणार नाही. 
  • याव्यतिरिक्त केवायसी प्रक्रिया होऊ शकणार नाही आणि सरकारी सेवांपासूनही वंचित राहाल. 
  • म्युच्युअल फंड आणि इक्विटीमध्येही गुंतवणूक करू शकणार नाही.  
PAN कार्ड Aadhaar कार्डशी लिंक कसं करावं? 
  • आयकर ई-फायलिंग पोर्टल incometax.gov.in/iec/foportal ला भेट द्या.
  • डाव्या बाजूस 'Link Aadhaar' टॅबवर क्लिक करा.
  • आपले पॅन आणि आधार कार्डवरील नंबर सबमिट करा आणि 'Validate' बटणावर क्लिक करा. 
  • आधार आणि पॅन कार्ड पूर्वीपासूनच लिंक असेल तर स्क्रीनवर मेसेज दिसेल.
  • आधार आणि पॅन कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला मोबाइल क्रमांक विचारला जाईल आणि एक OTP पाठवला जाईल. 
  • याद्वारे PAN कार्ड आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. 
Listen to the latest songs, only on JioSaavn.com