जाहिरात

Aadhaar-PAN card link : पॅन-आधार लिंक न केल्यास मोठा फटका; पगार अन् गुंतवणुकीवरही होईल परिणाम

आधार कार्डाशी पॅन कार्ड लिंक करणं आता आवश्यक झालं आहे. जर तुम्ही ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आधार-पॅन कार्ड लिंक केलं नाही तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन कार्ड बंद होईल.

Aadhaar-PAN card link : पॅन-आधार लिंक न केल्यास मोठा फटका; पगार अन् गुंतवणुकीवरही होईल परिणाम

Pan Aadhaar link deadline : आधार कार्डाशी पॅन कार्ड लिंक करणं आता आवश्यक झालं आहे. जर तुम्ही ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आधार-पॅन कार्ड लिंक केलं नाही तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन कार्ड बंद होईल. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) यांनी यासंदर्भात एक सूचना जारी केली आहे. दुसरीकडे टॅक्सबजीने सोशल मीडियावर एक अलर्ट जारी केला आहे. यानंतर आयटीआर फाइल होणार नाही, रिफंड मिळणार नाही आणि अनेक आर्थिक कामं थांबू शकतात. 

टॅक्सबडीने लिहिलंय, तुमचं पॅन 1 जानेवारी २०२६ पासून बंद होईल. यामुळे तुम्ही ITR फाइल करू शकणार नाही, रिफंड मिळणं बंद होईल.इतकच नाही तर पगार आणि एसआयपीदेखील फेल होऊ शकते. 

सरकारने आतापर्यंत अनेकदा पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. मात्र अद्याप कोणतीही नवी तारीख घोषित करण्यात आलेली नाही. सध्या तरी ३१ डिसेंबर २०२५ ही डेडलाइन देण्यात आली आहे. आता प्रश्न आहे की, पॅन-आधार लिंक कसं कराल, कोण लिंक करू शकतात, कोणत्या गोष्टीची काळजी घ्याल...

नक्की वाचा - What is e KYC: ई-केवायसी म्हणजे काय? फायदे काय आहेत? वाचा सविस्तर


पॅन-आधार लिंक करणं कोणासाठी आवश्यक? Who needs to link PAN-Aadhaar

अर्थ मंत्रालयाने ३ एप्रिल २०२५ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार, ज्यांनी १ ऑक्टोबर २०२४ पूर्वी आधार एमरोलमेंट आयडीच्या आधारावर पॅन कार्ड दिला आहे, त्यांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आधार नंबर इनकम टॅक्स विभागाला द्यावं लागेल. जर तुमचं पॅन कार्ड हे आधार नोंदणी आयडी वापरून तयार केलं असेल, तर आधार क्रमांक मिळाल्यानंतर, तुम्हाला आधार-पॅन पुन्हा लिंक करावे लागेल.

आधार-पॅन लिंक केलं नाही तर काय होईल? (What will happen if PAN is not linked?)

- तुमचं पॅन कार्ड मुदत संपल्याच्या दुसऱ्या दिवशी निष्क्रिय होईल. 
- आयटीआर फाइल किंवा वेरिफाय करू शकत नाही. 
- आयटीआर रिफंड होणार नाही. 
- पेंडिग आयटीआर प्रोसेड होणार नाही.
- Form 26AS मध्ये TDS/TCS क्रेडिट दिसणार नाही. 
- TDS/TCS जास्त कापलं जाईल. 

नक्की वाचा - EPFO : PF मधून 100 % रक्कम काढता येणार; कोणत्या कारणांसाठी पैसे काढू शकता? काय आहे नवी नियमावली?


सॅलरी किंवा गुंतवणूक थांबणार? ( Will salary or investment stop?) 

जर तुमचे बँक खाते किंवा गुंतवणूक आधीच active असेल, तर कोणतेही पैसे ब्लॉक केले जाणार नाहीत.

पॅन कार्ड निष्क्रिय असेल तर तुम्ही काय करू शकणार नाही?

तुम्ही नवीन गुंतवणूक करू शकणार नाही.

तुम्ही शेअर्सची देवाणघेवाण करू शकणार नाही किंवा तुमचे केवायसी अपडेट करू शकणार नाही.

कर-संबंधित काम थांबवले जाईल.

याचा अर्थ तुमचे पैसे सुरक्षित राहतील, परंतु व्यवहार आणि टॅक्स कम्प्लायन्स थांबले जाईल.

पॅन-आधार लिंक कसं कराल?  How to link PAN with Aadhaar?

आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट, incometax.gov.in वर जा.

'लिंक आधार' पर्यायावर क्लिक करा.

तुमचा पॅन, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा.

नंतर व्हॅलिडेट वर क्लिक करा.

जर लिंक केले नसेल, तर तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा.

OTP प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
लिंकिंग पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर एक conformation मेसेज दिसेल.

'क्विक लिंक्स → लिंक आधार स्थिती' वर स्टेटस चेक करा.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com