जाहिरात
Story ProgressBack

Akshaya Tritiya 2024: नातेवाईक-मित्रपरिवाराला अक्षय्य तृतीयेच्या पाठवा या खास शुभेच्छा

Read Time: 2 min
Akshaya Tritiya 2024: नातेवाईक-मित्रपरिवाराला अक्षय्य तृतीयेच्या पाठवा या खास शुभेच्छा

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीया 10 मे रोजी साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी अन्नपूर्णा मातेसह महालक्ष्मीची मातेची देखील पूजा करण्याची परंपरा आहे. अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी सोने-चांदी-वाहन खरेदी, दुकानाचे उद्घाटन तसेच गृहप्रवेश इत्याही महत्त्वपूर्ण कार्यांचा शुभारंभ केला जातो. या शुभ मुहूर्तावर होमहवन, जप, दान, पूजा-पाठ इत्यादी गोष्टीही केल्या जातात. अक्षय्य तृतीयेनिमित्त मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना मराठी भाषेतील हे खास शुभेच्छा संदेश पाठवा आणि सण साजरा करा. 

अक्षय्य तृतीया 2024 : खास मराठीतून शुभेच्छा l Happy Akshaya Tritiya 2024

अक्षय्य तृतीयेला सोन्यासारखे उजळून निघो तुमचे नशीब  
अन्नपूर्णा मातेचा मिळो आशीर्वाद 
महालक्ष्मी येवो तुमच्या घरी 
सर्व संकट-अडचणी होवो दूर  
धनधान्य-संपत्तीची होवो भरभराट 
सुवर्णमय असो या सणाची पहाट
अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा 2024
Happy Akshaya Tritiya 2024

(नक्की वाचा: अक्षय्य तृतीयेला जुळून येत आहे मोठा शुभ योग, जाणून घ्या पूजा-सोने खरेदीचा शुभ मुहूर्त)

व्यवसायामध्ये तुमच्या दिवसेंदिवस होवो वाढ  
कुटुंबामध्ये आपुलकी आणि प्रेमाचे रुजू दे झाड  
घरामध्ये नांदो सुख-शांती समृद्धी-समाधान 
अक्षय्य तृतीयेचा सण घेऊन येवो भरभराट  
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Akshaya Tritiya 2024

अक्षय तृतीयेच्या दिवशी  महालक्ष्मीआईची राहो तुमच्यावर कृपा
जीवनामध्ये येवो आनंद अपार  
आयुष्यात एकही दुःख - संकट न राहो
तिजोरीमधील धनसंपत्तीची होवो वाढो
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Akshaya Tritiya 2024

सोन्याचा रथ, चांदीच्या पालखीमध्ये 
बसून महालक्ष्मीचे झाले तुमच्या घरी आगमन 
आता तुमच्या कुटुंबीयांवर होणार सुख-समृद्धीचा वर्षाव 
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Akshaya Tritiya 2024

लक्ष्मीदेवीचा तुमच्यावर कायम राहो आशीर्वाद 
धनधान्यसंपत्ती कायम राहो तुमच्याकडे अपार 
अक्षय्य तृतीयेच्या 2024 शुभेच्छा!
Happy Akshaya Tritiya 2024

तुमचे प्रत्येक कार्य होवो पूर्ण 
कोणतेही स्वप्न राहू नये अपूर्ण
आयुष्य संपत्ती आणि प्रेमाने राहो व्यापलेले
घरामध्ये होवो महालक्ष्मीचे आगमन  
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा 2024 

VIDEO: Bombay Fashion Weekच्या रॅम्प वॉकवर तारेतारकांचा जलवा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination