जाहिरात

30 एप्रिलपासून या तीन राशींचे येणार अच्छे दिन, अक्षय्य तृतीयेला जुळले आले मोठे राजयोग

Akshaya Tritiya 2025 Shubh Yog: यंदा अक्षय्य तृतीयेला 24 वर्षांनंतर दुर्मीळ योग जुळून आले आहेत. यंदा अक्षयसह गजकेसरी योग जुळून आलाय, यामुळे कोणत्या तीन राशींचा फायदा होणार आहे? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

30 एप्रिलपासून या तीन राशींचे येणार अच्छे दिन, अक्षय्य तृतीयेला जुळले आले मोठे राजयोग
"Akshaya Tritiya 2025 Shubh Yog: कोणत्या तीन राशींना होणार फायदा?"

Akshaya Tritiya 2025 Date and Time: हिंदू धर्मामध्ये अक्षय्य तृतीयेला अतिशय विशेष महत्त्व आहे. हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेल्या कामामध्ये नक्कीच यश आणि समृद्धी मिळते, असे म्हणतात. या दिवशी लक्ष्मीमाता आणि धनाची देवता कुबेर यांची विधिवत पूजा केली जाते. तसेच सोने, चांदी किंवा मौल्यवान धातू खरेदी करणेही शुभ मानले जाते. यंदा अक्षय्य तृतीया 30 एप्रिलला साजरी करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यंदा अक्षय्य तृतीयेला अनेक अत्यंत शुभ आणि दुर्मीळ राजयोग जुळून आले आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा गजकेसरी योग, लक्ष्मी नारायण योग आणि मालव्य राजयोग हे शुभ योग जुळून आले आहेत. या राजयोगांच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. या राशींना लक्ष्मीमातेचा आशीर्वाद मिळेल, त्यांचे करिअर, संपत्ती आणि खासगी जीवनात मोठे बदल घडू शकतात. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ग्रहांचे विशेष योग  

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ग्रहांची विशेष युती तयार होत झाल्याचे दिसतंय. मीन राशीमध्ये शनि, बुध, शुक्र आणि राहू एकत्र असतील, यामुळे चतुर्ग्रही योगही निर्माण होतील. या दिवशी मालव्य योग आणि लक्ष्मी नारायण योग देखील जुळून आले आहेत, जे अतिशय शुभ मानले जात आहेत. याव्यतिरिक्त चंद्र या दिवशी वृषभ राशीमध्ये गुरु ग्रहासोबत स्थिर असेल, ज्यामुळे गजकेसरी राजयोग तयार होत आहे. इतकंच नव्हे तर या तिथीला रवि योग आणि सर्वार्थ सिद्धी योग यासारखे शुभ योग देखील तयार होत आहेत, ज्यामुळे अक्षय्य तृतीयेचा योग अधिक फलदायी ठरू शकतो.  

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीया कधी आहे? लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत

(नक्की वाचा: Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीया कधी आहे? लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत)

वृषभ राशी  

अक्षय्य तृतीयेचा शुभ दिवस वृषभ राशीकरिता विशेष स्वरुपात फायदेशीर ठरू शकतो. ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे या राशीवर लक्ष्मीमाता आणि भगवान कुबेर यांचे विशेष आशीर्वाद मिळण्याची शक्यता आहे. यामुळे जीवनाच्या अनेक क्षेत्रात प्रगती आणि यश मिळण्याचे योग आहेत. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या आता दूर होऊ शकतात. करिअरच्या दिशेने सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विश्वास दाखवून काही महत्त्वाची जबाबदारी सोपवू शकतात.

नोकरीच्या क्षेत्रात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय गाडी किंवा मालमत्ता मिळण्याचेही योग आहेत. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो. एकूण अक्षय्य तृतीयेच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांसाठी समृद्धी आणि प्रगतीचे द्वार उघडू शकतात.

Happy Akshaya Tritiya 2025 Wishes: घरात नांदो आनंद, लाभो संपत्ती अपार; अक्षय्य तृतीयेच्या पाठवा खास शुभेच्छा

(नक्की वाचा: Happy Akshaya Tritiya 2025 Wishes: घरात नांदो आनंद, लाभो संपत्ती अपार; अक्षय्य तृतीयेच्या पाठवा खास शुभेच्छा)

मीन राशी  

  1. मीन राशीच्या लोकांसाठीही अक्षय्य तृतीयेचा दिवस अतिशय शुभ आणि भाग्यशाली ठरू शकतो. 
  2. या दिवशी कित्येक शुभ आणि प्रभावशाली राजयोग जुळून आले आहेत, ज्यामुळे जीवनात सकारात्मक बदल निर्माण होण्याची शक्यता आहे.
  3. या विशेष योगाच्या प्रभावामुळे नोकरी करणाऱ्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदे मिळू शकतात. 
  4. तुम्हाला उच्च पद किंवा पगारवाढीसारखी चांगली बातमी मिळू शकते. 
  5. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. 
  6. कुठेतरी अडकलेले किंवा कोणी तुमच्याकडून उसणे घेतलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे.
  7. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठीही हा काळ चांगला ठरू शकतो.
  8. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पाची किंवा पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.  

मिथुन राशी  

  1. मिथुन राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस खूप शुभ ठरू शकतो. 
  2. ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. 
  3. व्यावसायिकांना मोठी ऑर्डर किंवा डील मिळू शकते, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. 
  4. नोकरदार वर्गाला त्यांच्या कारकिर्दीत प्रगती आणि फायदे मिळण्याची शक्यता आहे. 
  5. बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळू शकतात. आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ आनंददायी असेल, कारण तुमची आर्थिक संकटातून सुटका होऊ शकते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होऊ शकतील. 
  6. कौटुंबिक नात्यांमध्ये सुधारणा होईल, विशेषतः वडिलांसोबतचे नाते अधिक मजबूत होईल. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: