जाहिरात

Ambedkar Jayanti 2025 Bank Holiday: 14 एप्रिलला बँका बंद असणार आहेत की खुल्या?

Ambedkar Jayanti 2025 Bank Holiday: आंबेडकर जयंतीच्या दिवशी बँका बंद असणार आहेत का?

Ambedkar Jayanti 2025 Bank Holiday: 14 एप्रिलला बँका बंद असणार आहेत की खुल्या?
Ambedkar Jayanti 2025 Bank Holiday: 14 एप्रिलला बँकांना सुटी आहे का?

Ambedkar Jayanti 2025 Bank Holiday: देशातील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँका पुढील आठवड्यामध्ये बहुतांश राज्यांत केवळ चार दिवसांसाठी कार्यरत असणार आहेत. 14 एप्रित ते 20 एप्रिलदरम्यान देशात आंबेडकर जयंती (Ambedkar Jayanti  2025) आणि अन्य सणांमुळे बँकांना सुटी असणार आहे. भारताच्या संविधान निर्मितीमध्ये डॉ. आंबेडकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय. जातीपातीचे भेदभाव मिटवण्यासाठी आणि समाजातील सर्वांना हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त काही ठिकाणी सार्वजनिक सुटी दिली जाते. या दिवशी महाराष्ट्रामध्ये बँका बंद असणार आहेत की खुल्या? जाणून घेऊया माहिती...  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आरबीआयच्या (RBI) सुटी कॅलेंडरनुसार आंबेडकर जयंतीव्यतिरिक्त (Ambedkar Jayanti  2025) 14 एप्रिल रोजी विशु, बिजु, बुईसू, महाविशुभ संक्रांती, तामिळ नववर्ष दिन, बोहाग बिहू आणि चेराओबा या सणांचाही समावेश आहे.  

Ambedkar Jayanti 2025 Wishes: डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाठवा प्रेरणादायी शुभेच्छा

(नक्की वाचा: Ambedkar Jayanti 2025 Wishes: डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाठवा प्रेरणादायी शुभेच्छा)

14 एप्रिलला कोणत्या राज्यांमध्ये असणार बँकांना सुटी? (Bank Holiday On April 14 In These States)

14 एप्रिल रोजी त्रिपुरा, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, गोवा, झारखंड, सिक्कीम, तामिळनाडू, गुजरात, चंदीगड, केरळ,  कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, तेलंगणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि आसाम या राज्यांमध्ये बँका बंद असतील.

Ambedkar Jayanti 2025: आंबेडकर जयंती पहिल्यांदा कोणी साजरी केली? काय आहे पुणे कनेक्शन? जाणून घ्या इतिहास

(नक्की वाचा: Ambedkar Jayanti 2025: आंबेडकर जयंती पहिल्यांदा कोणी साजरी केली? काय आहे पुणे कनेक्शन? जाणून घ्या इतिहास)

बँका कोणत्या राज्यांमध्ये  खुल्या असतील?

  • मध्य प्रदेश, नागालँड, नवी दिल्ली, छत्तीसगड, मेघालय आणि हिमाचल प्रदेशमध्ये बँका खुल्या राहतील.
  • सुटीच्या दिवशी बँका बंद असतील पण इंटरनेट बँकिंग आणि एटीएम सेवा नेहमीप्रमाणे सुरू असतील.  

15 एप्रिलला देखील बँकांना सुटी असणार आहे का?

  • आरबीआयच्या सुटीच्या कॅलेंडर यादीनुसार बंगाली नववर्ष दिन, हिमाचल दिन आणि बोहाग बिहूनिमित्त 15 एप्रिल रोजी त्रिपुरा, आसाम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेश येथे बँका बंद असतील.
  • तसेच 18 एप्रिलला गुड फ्रायडेनिमित्त बँका बंद असतील. दुसऱ्या दिवशी महिन्याचा तिसरा शनिवार असेल म्हणजेच 19 एप्रिलला बँका सुरू राहतील.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: