
Ambedkar Jayanti 2025 Date: देशभरात दरवर्षी 14 एप्रिल रोजी डॉ. भीमराव आंबेडकर (Ambedkar Jayanti 2025) यांची जयंती साजरी केली जाते. हा दिवस भीम जयंती या नावानंही ओळखला जातो. 'भारतीय संविधानाचे जनक' डॉ. आंबेडकर यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. 1891 साली जन्मलेले डॉ. आंबेडकर केवळ भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार नव्हते तर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, कायदेतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक देखील होते. अशा या महामानवाची जयंती देशभरात साजरी करून सर्वजण त्यांना आदरांजली वाहतात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
14 एप्रिल 2025 ला डॉ. आंबेडकर यांची 135वी जयंती आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त (Ambedkar Jayanti 2025 Date) वेगवेगळ्या ठिकाणी रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाद्वारे भावी पिढीपर्यंत त्यांचे विचार पोहोचावे यासाठी त्यांच्या विचारांचा-योगदानाचा प्रसार आणि प्रचार केला जातो. आंबेडकर जयंतीचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेऊया...
आंबेडकर जयंतीचा इतिहास (Dr Ambedkar Jayanti 2025 History)
माहितीनुसार आंबेडकर जयंती (Ambedkar Jayanti 2025) पहिल्यांदा 14 एप्रिल 1928 रोजी पुण्यामध्ये साजरी करण्यात आली होती. यासाठी सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे (Janardan Sadashiv Ranapisay) यांनी पुढाकार घेतला होता. तेव्हापासून दरवर्षी आंबेडकर जयंती साजरी केली जात आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील कित्येक देशांमध्ये स्थायिक असलेले भारतीय नागरिकही आंबेडकर जयंती साजरी करतात.
(नक्की वाचा: Ambedkar Jayanti 2025 Wishes: डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाठवा प्रेरणादायी शुभेच्छा)
आंबेडकर जयंतीचे महत्त्व (Ambedkar Jayanti Significance)
आंबेडकर जयंती साजरी करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे समाजात समता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांचा प्रसार करणे आहे. डॉ. आंबेडकर यांनी संविधानाच्या निर्मितीत जे योगदान दिलंय, ते भारताला एक आधुनिक, लोकशाहीवादी आणि समतावादी राष्ट्र बनवण्यासाठीचा पाया होता. त्यांनी महिला, मागासवर्गीय आणि दलित समुदायाच्या सक्षमीकरणासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली. 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' त्यांचा हा संदेश आजही लोकांना प्रेरणा देतो.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world