
Anant Chaturdashi 2025 Date: हिंदू परंपरेनुसार भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षाची चतुर्दशी तिथी अतिशय महत्त्वाची मानली जाते. कारण या दिवशी व्रत केल्यास भगवान श्री विष्णू यांच्याकडून भाविकांवर अनंत आशीर्वादाचा वर्षाव होतो, असे म्हणतात. याच दिवशी गणेशोत्सवही पूर्ण होतो आणि भाविक गणपती बाप्पाला वाजतगाजत निरोपही देतात. पंचांगानुसार यंदा अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2025) 6 सप्टेंबर 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. असंख्य लाभ मिळणाऱ्या या पवित्र सणाची पूजा करण्याची पद्धत, शुभ मुहूर्त इत्यादी गोष्टींबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया..
अनंत चतुर्दशीच्या पूजेचे साहित्य (Anant Chaturdashi 2025 Puja Samagri)
हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, गंध, फुले, दुर्वा, तुळस, कापूर, बेलपत्र, अक्षता, उदबत्ती, विड्याची पाने 25, सुपाऱ्या 40, श्रीफळ 2, खारका 10, बदाम 10, खोबऱ्याच्या वाट्या 2, गूळ, खोबरे, सुवासिक तेल, केळी, पेरू, पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर) निरांजन, जानवीजोड, शेंदूर, बुक्का, दर्भाचा शेष (नाग), अनंत, पंचा एक, काडवाती, कापसाची वखे, वायन (अनारसे किंवा बत्तासे), सुटी नाणी पाच रुपयांची दक्षिणा, ब्राह्मण-सुवासिनी भोजन याप्रमाणे तयारी करावी.
अनंत चतुर्दशीच्या पूजेला लागणारी पत्री (Anant Chaturdashi 2025 Puja Patri)
- पळसाची पाने
- उंबराची पाने
- पिंपळाची पाने
- माक्याची पाने
- जटामांसीची पाने
- अशोकाची पाने
- कवठाची पाने
- वडाची पाने
- आंब्याची पाने
- केळीची पाने
- आघाड्याची पाने
- कण्हेरीची पाने
- उंडलाची पाने
- नागवेलीची पाने
अनंत चतुर्दशीच्या पूजेला लागणारी फुले (Anant Chaturdashi 2025 Puja Flowers)
- कमळाची फुले
- जाईची फुले
- चाफ्याची फुले
- पांढरे कमळ
- केवडा
- बकुळीची फुले
- उंडलाची फुले
- कण्हेरीची फुले
- धोतऱ्याची फुले
- मोगऱ्याची फुले
- जुईची फुले
अनंत चतुर्दशीची पूजा कशी करावी? (Anant Chaturdashi 2025 Puja Vidhi)
- पंचांगानुसार यंदा अनंत चतुर्दशीची पूजा करण्यासाठी 06 सप्टेंबर रोजी सकाळी 06:02 वाजेपासून ते दुपारी 01:41 वाजेपर्यंत सर्वात उत्तम मुहूर्त आहे.
- या कालावधीदरम्यान भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा करावी.
- अनंत चतुर्दशीदिवशी भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी पहाटे उठा. स्नानध्यान करावे.
- श्री हरींचे व्रत विधीवत करण्याचा संकल्प करावा.
- घराच्या ईशान्य दिशेला किंवा पूजेच्या ठिकाणी लक्ष्मी नारायणाची मूर्ती अथवा त्यांची प्रतिमा स्थापित करावी.
- यानंतर हळदकुंकू, चंदन, केशर इत्यादी गोष्टींनी श्री हरिंना टिळा लावावा.
- शुद्ध पाण्याने भरलेला कलश चौरंगावर ठेवा. त्यास दोन पंचे गुंडाळावे. दर्भसर्प तयार करावा. तो त्यावर ठेवावा.
- कलशावर पात्र ठेवावे. त्यात अनंत प्रतिमा अथवा शाळीग्राम ठेवा.
- त्याचे षोडशोपचार पूजन करावे. तांबड्या रंगाचा रेशीम दोरा घ्यावा. त्यास 14 गाठी मारुन त्याची पूजा करावी.
- पूजेनंतर दोरा उजव्या हाताच्या मनगटावर बांधावा.
- तसेच श्री हरींच्या मंत्रांचा जप करावा किंवा श्री विष्णु सहस्त्रनामाचंही पठण करावे.
- चौदा वर्षे अनंत पूजन करावे, म्हणजे मनोरथपूर्ती होते.
- पंधराव्या वर्षी होमहवन करुन उद्यापन करावे.
(नक्की वाचा: Ganpati Visarjan 2025: गणपती विसर्जनादिवशी उत्तरपूजा कशी करावी? कसा द्यावा बाप्पाला निरोप)
अनंत चतुर्दशी व्रताचे धार्मिक महत्त्व (Anant Chaturdashi Vrat Significance)
- अनंत रुपामध्ये अनंत नामाने प्रसिद्ध असलेले भगवान विष्णूंचे 1001 तुळशीपत्र वाहून पूजन करावे.
- अनंत चतुर्दशी व्रतामुळे गतवैभव, गतमान, मनःशांती मिळते; असे म्हणतात.
- ऐश्वर्य प्रदान करणाऱ्या या पूजेचा धागा मनगटावर बांधणे लाभदायक ठरते, असे मानले जाते. यास अनंत धागा असेही म्हणतात.
- भगवान विष्णुंची अनंत स्वरूपात पूजन केल्याने विशेष आशीर्वाद प्राप्त होतात.
- लक्ष्मी मातेचीही कृपा होते,असेही म्हणतात.
- दुःख, संकटं,अडचणी दूर होऊन सुखशांती प्राप्ती होते, असेही म्हणतात.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world