जाहिरात

Ganpati Visarjan 2025: गणपती विसर्जनादिवशी उत्तरपूजा कशी करावी? कसा द्यावा बाप्पाला निरोप

Ganpati Visarjan 2025: गणपती बाप्पाला निरोप कसा द्यावा? विसर्जनाच्या दिवशी पूजा कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती....

Ganpati Visarjan 2025: गणपती विसर्जनादिवशी उत्तरपूजा कशी करावी? कसा द्यावा बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan 2025: गणपती विसर्जनादिवशी उत्तर पूजन कसे करावे?

Ganpati Visarjan 2025: गणपती बाप्पाची दहा दिवस मनोभावे पूजा आणि सेवा केल्यानंतर शनिवारी (6 सप्टेंबर) बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. दहा दिवस चालणारा हा उत्सव प्रत्येक गणेशभक्तासाठी अतिशय खास असतो. दहा दिवसांनंतर बाप्पाला निरोप देणे हा क्षण भाविकांसाठी अतिशय कठीण असतो. गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढत पुढच्या वर्षी लवकर ये, असे म्हणत गणपती देवतेला वाजत गाजत निरोप दिला जातो. गणेश विसर्जनादिवशी उत्तर पूजा कशी करावी? विसर्जन कोणत्या मुहूर्तावर करावे? जाणून घेऊया माहिती...

गणेश विसर्जन मुहूर्त (Ganpati Visarjan 2025 Muhurat)

गणेश विसर्जन चौघडिया मुहूर्त : 06 सप्टेंबर 2025

शुभ मुहूर्त: सकाळी 07:36 वाजेपासून ते सकाळी 09:10 वाजेपर्यंत आहे. 
चर, लाभ आणि अमृत मुहूर्त : दुपारी 12:19 वाजेपासून से संध्याकाळी 05:02 वाजेपर्यंत आहे.
लाभ मुहूर्त : संध्याकाळी 06:37 वाजेपासून ते रात्री 08:02 वाजेपर्यंत आहे. 
शुभ, अमृत, चर मुहूर्त: रात्री 09:28 वाजेपासून ते मध्यरात्री 01:45 (AM) वाजेपर्यंत आहे. 

(नक्की वाचा: Pune News : पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल, गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील 15 रस्ते बंद)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: PTI

गणेश विसर्जन चौघडिया मुहूर्त : 07 सप्टेंबर 2025

लाभ मुहूर्त: पहाटे 04:36 वाजेपासून ते संध्याकाळी 06:02 वाजेपर्यंत आहे.

(नक्की वाचा: Pune News : पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी; मानाच्या गणपतींच्या वेळापत्रकासह नियमावली जाहीर)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: PTI

उत्तर पूजा कशी करावी? 

स्वच्छ हातपाऊ धुऊन पूजेला बसावे. 
कपाळाला गंध-कुंकू लावावे.
संकल्प करावा. 
'श्री सिद्धिविनायकप्रीत्यर्थ पंचोपचारै: उत्तरपूजनं करिष्ये' असे म्हणून पंचोपचारांनी पूजा करावी. 
श्री सिद्धिविनायक नमः |विलेपनार्थे चंदनं समर्पयामि (गंध लावावे)
श्री सिद्धिविनायक नमः | पुष्पाणि समर्पयामि (फुले अर्पण करावी) 
श्री सिद्धिविनायकाय नमः । धूपं समर्पयामि। (उदबत्तीने ओवाळावे)
श्री सिद्धिविनायकाय नमः। दीपं समर्पयामि। (नीरांजन ओवाळावे)
श्री सिद्धिविनायकाय नमः। नैवेद्यं समर्पयामि। (नैवेद्य अर्पण करावा)

विडा, दक्षिणा ठेवावी. श्रीफळ वाढवावा. सर्व मंडळींच्या कल्याणासाठी गणरायाकडे प्रार्थना करावी. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: PTI

यांतु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीम् । इष्टकामप्रसिद्धयर्थ पुनरागमनाय च ॥ या मंत्राने मूर्तीवर 'मंगलमूर्ती मोरया' या नामघोषाने अक्षता अर्पण कराव्या.

अनेन उत्तरपूजनेन श्री सिद्धिविनायकः प्रीयताम् । म्हणून उदक सोडावे. 
नंतर आरती करावी. गणपती बाप्पाला गंधपुष्प अर्पण करावे. बाप्पाला नमस्कार करावा. विसर्जनाच्या अक्षता अर्पण कराव्या. 
मूर्ती थोडीशी सरकवावी. वाजतगाजत सर्वांनी मिळून मूर्तीचे विसर्जन करावे. गणपतीचा जयजयकार करावा आणि म्हणावे
मंगलमूर्ती मोरया। गणपती बाप्पा मोरया। पुढच्या वर्षी लवकर या।

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: PTI

विसर्जन करताना गणेश मूर्ती पाण्यात फेकू नये तर आदरपूर्वक आणि सुरक्षित पद्धतीने मूर्ती प्रवाहित करावी. 

पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक गौरव देशपांडे यांनी विसर्जनाबाबत काय सांगितलंय तेही ऐका? VIDEO

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com