जाहिरात

Moti Stone Benefits: मोती रत्न कोणासाठी शुभ? जाणून घ्या फायदे, तोटे आणि परिधान करण्याचे योग्य नियम

Pearl Gemstone: मोती रत्न चंद्र ग्रहाशी संबंधित आहे. या रत्नामुळे मन शांत होण्यास, चिंता कमी होण्यास आणि भावनिक संतुलन टिकून राहण्यास मदत मिळते.

Moti Stone Benefits: मोती रत्न कोणासाठी शुभ? जाणून घ्या फायदे, तोटे आणि परिधान करण्याचे योग्य नियम
"मोती रत्न परिधान करण्याचे फायदे"
Freepik

Moti Ratn Fayde: पांढऱ्या रंगाच्या मोतीला पर्ल असेही म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार या रत्नाचे चंद्र ग्रहाशी खास कनेक्शन मानले जाते. एखाद्या व्यक्तीला जीवनात जास्त प्रमाणात ताण, अतिविचार किंवा भावनिक चढ-उताराचा सामना करावा लागत असेल तर मोती रत्नामुळे मदत मिळू शकते. मोती रत्न परिधान केल्यास मन शांत राहण्यास आणि विचारांमध्ये सकारात्मकता येण्यास मदत मिळेल, असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील कमकुवत चंद्र ग्रह मजबूत होण्यास आणि जीवनात भावनिक संतुलन टिकून राहण्यासही मदत मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या लोकांसाठी मोती रत्न शुभ ठरेल, याचे फायदे, तोट आणि रत्न परिधान करण्याचे नियम जाणून घेऊया...

मोती रत्न कोणत्या लोकांसाठी शुभ मानला जातो? (Who Should Wear Pearl Gemstone)

ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती कमकुवत असते, त्यांच्यासाठी मोती रत्न फायदेशीर मानले जाते. ज्या लोकांना पटकन मानसिक ताण येतो, छोट्या-छोट्या गोष्टींमुळे जे लोक त्रस्त होतात किंवा ज्यांचा मूड वारंवार बदलत राहतो, त्यांच्यासाठीही मोती रत्न चांगले मानले जाते. कर्क, वृश्चिक, मीन आणि काही प्रकरणांमध्ये मेष राशीकरिताही मोती रत्न फायदेशीर ठरू शकते. याव्यतिरिक्त जे लोक रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, झोपेच्या समस्या, कायम अस्वस्थ असणाऱ्या लोकांनाही मोती रत्नामुळे लाभ मिळू शकतील.

मोती रत्न परिधान करण्याचे फायदे (Benefits of Wearing Pearl Gemstone)

मोती रत्न परिधान करण्याचा सर्वाधिक मोठा फायदा मनाशी जोडलेला असतो. यामुळे मेंदू शांत राहण्यास आणि नकारात्मक विचारही कमी होतात. जे लोक अतिविचार करतात किंवा ज्यांचे मन पटकन दुखावलं जातं, त्या लोकांना मोती रत्नामुळे आराम मिळू शकतो. आत्मविश्वासही वाढतो आणि निर्णय क्षमताही सुधारते. इतकंच नव्हे तर करिअरमध्ये स्थिरता येते आणि कामावर लक्षही केंद्रित होते.

Paush Month Rituals: पौष महिन्यात लग्नासह शुभ कार्य टाळावी? खरंच हा महिना अशुभ असतो का? ज्योतिषी काय म्हणाले?

(नक्की वाचा: Paush Month Rituals: पौष महिन्यात लग्नासह शुभ कार्य टाळावी? खरंच हा महिना अशुभ असतो का? ज्योतिषी काय म्हणाले?)

मोती परिधान करण्याचे अन्य फायदे (Pearl Stone Benefits)

1. मोती हे मनाला थंडावा देणारे रत्न मानले जाते. यामुळे तणाव, चिंता आणि अस्वस्थता यासारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

2. झोप येत नसल्यास किंवा वारंवार भीती किंवा चिंता वाटत असल्यास मोती रत्न परिधान करावे.

3. मोती रत्न परिधान केल्यास संवाद कौशल्यही सुधारते. रागातही व्यक्ती योग्य शब्दांचा वापर करतो, असे म्हणतात. ज्यामुळे नातेसंबंधांमध्येही सुधारणा होण्यास मदत मिळते.

4. ज्योतिषशास्त्र आणि आयुर्वेदानुसार मोती रत्न शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे हृदय मजबूत होण्यासह रक्ताभिसरण प्रक्रिया देखील सुधारते.

5. मोती रत्नामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. त्वचेवर नैसर्गिक तेज येते.

6. महिलांच्या शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलित होण्यास मदत मिळते.

मोती रत्नाचे तोटे (Side Effects of Pearl Gemstone)

ज्योतिषाचार्याच्या मते प्रत्येक रत्न प्रत्येकासाठीच फायदेशीर ठरेल, असे नाही. हीच बाब मोती रत्नासाठीही लागू होते. मोती रत्न परिधान केल्यानंतर काही लोक अधिक भावुक होऊ शकतात, छोट्या-छोट्या गोष्टींमुळे त्यांचे मन दुखावले जाऊ शकते किंवा एखादी व्यक्ती आवश्यकतेपेक्षा अधिक संवेदनशील होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये लोकांना जास्त झोप, आळस, सुस्तपणा जाणवेल. कुंडलीमध्ये चंद्र ग्रह आधीपासूनच मजबूत असेल आणि तरीही मोती रत्नाचा वापर केल्यास नुकसानही होऊ शकतात, म्हणूनच तज्ज्ञांच्या सल्ल्याविना मोती रत्न परिधान करणं टाळावं.

Mahalakshmi Ashtakam Benefits: रोज महालक्ष्मी अष्टक वाचल्यास कोणते लाभ मिळतील? या दिवशी पठण करणं अधिक फलदायी ठरेल

(नक्की वाचा: Mahalakshmi Ashtakam Benefits: रोज महालक्ष्मी अष्टक वाचल्यास कोणते लाभ मिळतील? या दिवशी पठण करणं अधिक फलदायी ठरेल)

मोती रत्न परिधान करण्यायी योग्य पद्धत (How to Wear Pearl Gemstone)

1. कायम खरं मोती रत्न परिधान करावे.

2. चांदीच्या अंगठीत मोती रत्न बसवून उजव्या हाताच्या करंगळीमध्ये घालण्याची परंपरा आहे.

3. मोती रत्न परिधान करण्यापूर्वी ते गंगाजल आणि कच्च्या दुधाने स्वच्छ करावे. यानंतर 'ॐ सोमाय नमः' मंत्राचा 108 वेळा जप करून ते धारण करणं शुभ मानले जाते.

4. मोती परिधान करण्यासाठी सोमवारचा दिवस आणि सकाळची वेळ शुभ मानली जाते.

मोती परिधान करण्यापू्र्वी कोणती काळजी घ्यावी? (Pearl Gemstone Rules)

1. मोडलेले, डाग असलेले आणि बनावट पद्धतीचे मोती रत्न कधीही परिधान करू नये.

2. मोती रत्न केमिकल, साबण आणि पर्रफ्युमपासून दूर ठेवावे.

3. मोती रत्न परिधान करण्यापूर्वी ज्योतिषींना जन्मकुंडली नक्की दाखवा.

4. योग्य सल्ल्याविना मोती रत्न परिधान केल्यास दुष्परिणामांचा सामना करावा लागू शकतो.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com