Ayurveda Wheat Eating Rules: आपल्यापैकी बहुतांश लोकांच्या आहारात रोज गव्हाची पोळी असतेच. पण हाच गहू आरोग्यासाठी नेमका केव्हा फायदेशीर ठरतो आणि केव्हा नुकसान करतो, हे तुम्हाला माहिती आहे का? आयुर्वेदात गव्हाला "गोधूम" म्हटले असून, त्याचे सेवन करण्याचे तीन महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. गव्हाचा योग्य लाभ मिळवण्यासाठी तो कसा आणि कोणत्या स्वरूपात खावा, पीठ चाळावे की नाही, याबद्दलचे नियम समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत डॉ. रुचा पै यांनी सांगितलेली महत्त्वाची माहिती जाणून घेऊया...
डॉ. रुचा पै यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये नेमके काय म्हटलंय? जाणून घेऊया...
रोज गव्हाची पोळी खाता? | Ayurveda Wheat Eating Rules
गहू नेमका केव्हा फायदेशीर असतो आणि केव्हा नाही, याबाबत माहीत आहे का?
आयुर्वेदात गव्हाबाबत 3 महत्त्वाचे नियम आहेत.
आयुर्वेदात गव्हाला "गोधूम" म्हणतात
गोधूम म्हणजे बलदायक शीत गुणांचा वात-पित्त संतुलित करणारा
पण बहुतेकांना वाटतं गहू म्हणजे एकच गोष्ट, आयुर्वेदाचे 3 नियम माहीत नसतात.
गव्हाचे 3 नियम | Wheat Flour Bran Benefits
नियम 1 - जुना गहू वापरा नवीन गहू कफ वाढवतो. वजन आणि सायनसवर परिणाम होतो.
नियम 2 - पीठ चाळू नका: कोंड्यामध्ये (bran) फायबर (fiber) आणि लोह (iron) असते, यामुळे पोषणतत्त्व वाया जातात.
नियम 3 - मैदा टाळा रवा, दलिया ठीक; पण मैदा पचायला जड, शरीरासाठी हानिकारक.
(नक्की वाचा : Left Over Tea Powder Hacks: पावसाळ्यात घरात माश्यांचा त्रास वाढलाय? महागडी औषधं सोडा, किचनमधील 'हा' सोपा उपाय करा)
गहू योग्य पद्धतीने कसा वापरावा?
जुना गहू निवडा किमान एक वर्ष जुना गहू वापरा. यामुळे कफ वाढत नाही, पचायला हलका असतो.
कोंडा ठेवा: पोळीचे पीठ मळताना ते चाळू नका, कारण कोंड्यामध्ये फायबर, लोह यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे.
मैदा पूर्णपणे टाळा बेकरी, नान, पिझ्झा यासारखे जंकफुड शरीरासाठी हानिकारक असतात.
(नक्की वाचा: Viral News: बापरे! जमिनीपासून 393 फुट उंचीवर हवेत दुकान, सामान खरेदी करायला जाताना भल्याभल्यांना फुटतो घाम)
डॉ. रुचा पै यांनी शेअर केलेली पोस्ट वाचा
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world