Most Inconvenient Convenience Store: सोशल मीडियावर सध्या चीनमधील एका अशा दुकानाची जोरदार चर्चा सुरू आहे, जे पाहून भल्याभल्या धाडसी लोकांना घाम फुटेल. हे कोणतेही साधे किराणा दुकान नाही, तर चीनच्या हुनान प्रांतातील शिनियुझाई नॅशनल जिओलॉजिकल पार्कमध्ये जमिनीपासून 393 फूट उंचीवर एका सरळ उभ्या खडकावर लटकलेले लाकडाच्या छोट्या केबिनसारखे शॉप आहे.
जगातील सर्वात धोकादायक दुकान (Shiniuzhai National Geological Park store)
लाकडापासून तयार केलेली ही छोटी केबिन अवघ्या दोन स्क्वेअर मीटरची आहे. हे जगातील सर्वात धोकादायक दुकान मानले जाते. या दुकानापर्यंत पोहोचणे प्रत्येकासाठी शक्य नाहीय, कारण यासाठी तुम्हाला प्रोफेशनल ट्रेकिंग गियर आणि लोखंडी दोरांच्या मदतीने त्या उभ्या खडकावर चढावे लागते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे येथे पोहोचण्यासाठीच सुमारे दीड तासाचा वेळ लागतो.
पाणी पिण्यावरही आहे कडक बंदी (China most inconvenient convenience store)
या दुकानाची सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे (स्टाफ) धाडस. हे दुकान हवेत लटकलेले असल्यामुळे येथे शौचालयाची (टॉयलेट) कोणतीही सुविधा नाही. तिथले कर्मचारी ड्युटीदरम्यान पाणी पिणे देखील टाळतात, जेणेकरून त्यांना वारंवार खाली उतरण्याची कसरत करावी लागू नये. विचार करा, स्वतःची तहान मारून इतरांची तहान भागवण्याचा हा संघर्ष खरोखरच कौतुकास्पद आहे. ते दररोज सकाळी जड सामान उचलून या दुकानापर्यंत चढून जातात.
(नक्की वाचा : VIDEO: मोबाइल फोन हिसकावून पळत होता चोर अन् अचानक आला हार्ट अटॅक, जागेवरच झाला मृत्यू!)
किंमत जाणून थक्क व्हाल (394 feet high cliffside shop china)
इतका संघर्ष असतानाही या दुकानातील वस्तूंच्या किमती अतिशय सामान्य आहेत. सहसा पर्यटन स्थळांवर वस्तू महाग असतात, पण येथे पाण्याची एक बाटली तुम्हाला फक्त 2 आरएमबी (RMB) म्हणजेच 28 रुपयांमध्ये मिळेल. जर तिथे कर्मचारी हजर नसेल, तर तुम्ही क्युआर कोड स्कॅन करून ऑनलाइन पेमेंट करू शकता. ही जागा आपल्याला शिकवते की मेहनत आणि प्रामाणिकपणापुढे डोंगराएवढी आव्हानेही लहान ठरतात.
(डिस्क्लेमर: ही माहिती सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टच्या आधारे देण्यात आली आहे. एनडीटीव्ही याची पुष्टी करत नाही.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world