शरीरातील व्हिटॅमिन B12ची कमतरता दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय, शाकाहाऱ्यांसाठी ठरेल रामबाण

Vitamin B12ची कमतरता निर्माण होणे ही आजच्या काळातील सर्वात गंभीर समस्या ठरतेय. तुमच्याही शरीरात आवश्यक असणाऱ्या या व्हिटॅमिनची कमतरता असेल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. व्हिटॅमिनची कमतरता भरुन काढण्यासाठी खास आयुर्वेदिक उपाय जाणून घेऊया...

जाहिरात
Read Time: 3 mins
शरीरातील व्हिटॅमिन B12ची कमतरता भरुन काढण्यासाठी उपाय

Ayurvedic Remedy for Vitamin B12: बहुतांश लोक हल्ली शरीरातील व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत. विशेषतः या व्हिटॅमिनची कमतरता शाकाहारी लोकांमध्ये दिसून येते. कारण व्हिटॅमिन B12 चा मुख्य स्रोत हे मांसाहारी पदार्थ आहेत. शरीरात या आवश्यक जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, स्मरणशक्ती कमी होणे, मूड बदलत राहणे, नैराश्य आणि गंभीर प्रकरणांमध्ये न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात. तुम्ही देखील व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेच्या समस्येचा त्रास सहन करताय का? तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. खास आयुर्वेदिक रेसिपी जाणून घेऊया, जी शाकाहारी लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे रामबाण उपाय?

आयुर्वेदानुसार आंब्याची कोय एका विशिष्ट पद्धतीने खाल्ल्यास शरीरातील व्हिटॅमिन B12ची कमतरता भरुन निघण्यास मदत मिळू शकते. आयुर्वेदामध्ये आंब्याच्या कोयीचे कित्येक फायदे सांगितले गेले आहेत. आयुर्वेदाव्यतिरिक्त अन्य काही संशोधनाद्वारेही आंब्याची कोय शरीरातील व्हिटॅमिन B12ची कमतरता भरुन काढण्यासाठी प्रभावी ठरू शकते, अशी माहिती समोर आलीय. गुजरात राज्यातील वडोदरा येथील पारुल विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार आंब्याच्या कोयीपासून तयार केलेल्या 100 मिली रसामध्ये 10 मायक्रोग्रॅम इतके व्हिटॅमिन B12 आढळते. एखाद्या प्रौढ व्यक्तीला दिवसभरात फक्त 2.4 मायक्रोग्रॅम (एमसीजी) व्हिटॅमिन B12ची आवश्यकता असते. त्यामुळे आंब्याच्या कोयीपासून तयार केलेला रस व्हिटॅमिन B12ची कमतरता भरुन काढण्यासाठी सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. 

Advertisement

Advertisement

(नक्की वाचा: Weight Loss Diet: पटापट वजन कमी करण्यासाठी या पिठाचे करा सेवन, डाएटिशियनने सांगितली योग्य पद्धत)

आणखी एका रीसर्चमधील माहितीनुसार आंब्याच्या कोयीपासून तयार केलेले चूर्ण देखील व्हिटॅमिन B12ची कमतरतेची समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरू शकते. रीसर्च रिपोर्टनुसार शाकाहारी आहाराचे सेवन करणाऱ्या एका व्यक्तीने सलग दोन महिने आंब्याच्या कोयीपासून तयार केलेले चूर्ण खाल्ले. यामुळे त्या व्यक्तीच्या शरीरातील व्हिटॅमिन B12ची पातळी 189pg/ml हून वाढून 217pg/ml पर्यंत पोहोचली. शिवाय थकवा आणि अशक्तपणा यासारख्या समस्याही कमी झाल्या.  

Advertisement

आंब्याच्या कोयीपासून रस कसा तयार करावा? 

  • आंब्याच्या कोयी रात्रभर (जवळपास 12 तास) गरम पाण्यात भिजत ठेवा. 
  • सकाळी उठल्यानंतर त्यावरील आवरण काढा आणि आतील गर वाटून घ्या.  
  • आंब्याच्या कोयीची तयार केलेली पेस्ट पातळ कापडाने गाळून घ्या. 
  • पेस्टमधून निघणारा अर्क एखाद्या बाटलीमध्ये भरा आणि रोज सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. 

(नक्की वाचा: Weight Loss Tips: या पिठामुळे 20 पट जलदगतीने फॅट्स होतील बर्न, जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेला उपाय)

आंब्याच्या कोयीचे चूर्ण कसे तयार करावे?

  • पावडर तयार करण्यासाठी आंब्याची कोय रात्रभर जवळपास 12 तासांकरिता गरम पाण्यात भिजवून ठेवा.  
  • सकाळी कोयीवरील आवरण काढून आतील भाग बारीक-बारीक स्वरुपात चिरुन घ्या. 
  • हे तुकडे दोन दिवस उन्हामध्ये सुकवा.  
  • तुकडे व्यवस्थित सुकल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक पावडर तयार करा.  
  • तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार चूर्णचे सेवन करावे.

व्हिटॅमिन B12ची कमतरता भरुन काढण्यासाठी हा उपाय रामबाण ठरू शकतो. हा उपाय केल्यास एकूणच तुमचे आरोग्य सुधारेल.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)