
Weight Loss Tips: धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे अनेकांचे खाणेपिण्याचे आणि व्यायाम करण्याचे गणित बिघडलंय. ज्यामुळे लोकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यापैकीच एक गंभीर समस्या म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणामुळे व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतोच शिवाय गंभीर आजारांनाही आयते निमंत्रण मिळते. शरीरामध्ये वाढणाऱ्या अतिरिक्त चरबीमुळे तुम्ही देखील त्रस्त आहात का? यावर उपाय शोधताय का? तर या लेखाद्वारे तुम्हाला नक्कीच मदत मिळू शकते. वजन कमी करण्यासाठी एक्सपर्टने सांगितलेला सोपा आणि रामबाण उपाय जाणून घेऊया...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तज्ज्ञांचं काय आहे म्हणणे?
आयुर्वेदिक डॉ. रोबिन शर्मा यांनी इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये डॉक्टरांनी एका पिठाबाबतची माहिती दिलीय. हे पीठ गव्हाच्या पिठाच्या तुलनेत 20 पट जलदगतीने फॅट्स बॅर्न करण्यास मदत करते.
भारतीय लोकांचे जेवण पोळीशिवाय अपूर्ण आहे. काही घरांमध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणातही पोळी खाल्ली जाते. बहुतांश लोकांच्या घरामध्ये पोळीसाठी गव्हाच्या पिठाचा वापर केला जातो. पण डॉ. रोबिन यांनी गव्हाच्या पिठापेक्षा अधिक चांगला पर्याय सुचवला आहे, ज्यामुळे वजन जलदगतीने कमी होण्यास मदत मिळू शकते.
(नक्की वाचा: Weight Loss Tips: न्युट्रिशनिस्टने 4 महिन्यात घटवले तब्बल 25 किलोग्रॅम वजन, फॅट्स कमी करण्यासाठी सांगितले 4 उपाय)
वजन कमी करण्यासाठी खास पीठ
वजन कमी करण्यासाठी डॉ. शर्मा यांनी जव धान्याच्या पिठाची पोळी खाण्याचा सल्ला दिलाय. गव्हाच्या तुलनेत जव धान्याच्या पिठामध्ये तीनपट प्रोटीन, चारपट फायबर आणि 20 पट फॅट्स बर्न करण्याची क्षमता असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. डॉक्टरांच्या माहितीनुसार गव्हामध्ये ग्लुटेनचे घटक असते, ज्यामुळे शरीराचे वजन वाढते. तर जव धान्यामध्ये बीटा ग्लुकनचे तत्त्व असते. ज्यामुळे फॅट्स जलदगतीने बर्न होण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त बीटा ग्लुकनमुळे शरीराची चयापचयाची क्षमता सुधारते. चयापचयाची क्षमता मजबूत असेल तर कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळते, यामुळे वजनही कमी होते.
(नक्की वाचा: Oiling Belly Button: झोपण्यापूर्वी नाभीवर लावा हे तेल, त्वचेसह पोटावर काय होतील परिणाम? न्युट्रिशनिस्टने सांगितले अद्भुत फायदे)
जव धान्याचे कसे करावे सेवन?
- वजन कमी करण्यासाठी डॉ. शर्मा यांनी सांगितले की, जव धान्याची पोळी खाण्यासह त्याचे पाणी देखील प्यावे.
- ग्लासभर पाण्यात मूठभर जव उकळा.
- पाणी उकळून अर्धे झाल्यास गॅस बंद करा.
- यानंतर पाणी गाळून प्यावे.
- काही दिवसांतच तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक बदल दिसून येतील.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world