Excessive Sweating Causes: उन्हाळ्यात जास्त घाम येणे, शरीराचा चिकटपणा, दुर्गंधी आणि थकवा या समस्या सामान्य आहेत. आयुर्वेद सांगतो की घाम येणे ही शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. शरीरात पित्त दोष आणि उष्णता वाढल्याने, तसेच तिखट आहार, कमी पाणी आणि ताणतणावामुळे हा त्रास वाढतो. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शरीराला थंड ठेवणे, हायड्रेट राहणे आणि पित्तशामक घटकांचा वापर करणे आवश्यक आहे. योग्य आहार आणि जीवनशैलीतील बदलांनी उन्हाळ्याचा त्रास कमी करता येतो. डॉ रुचा पै यांनी याबाबत दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया...
उन्हाळ्यात जास्त घाम येतो? | Why Do We Sweat Excessively?
चिकटपणा, दुर्गंधी, थकवा वाटतोय?
कारण समजून घ्या आणि आयुर्वेदिक उपाय शिका
आयुर्वेद सांगतो -
घाम येणं हे शरीराचं नैसर्गिक संरक्षण
शरीर तापमान कमी करण्यासाठी घाम सोडतं
का जास्त घाम येतो?
- पित्त दोष वाढलेला
- शरीरात उष्णता जास्त
- तिखट, तेलकट, आम्ल आहार
- पाणी कमी पिणं
- ताण-तणाव (Stress)
काय त्रास होऊ शकतो?
- त्वचेवर खाज, फंगल इन्फेक्शन
- शरीरातून दुर्गंधी
- थकवा, डिहायड्रेशन
मग करायचं काय?
हे 5 उपाय रोज करा
1 थंड पाणी
2 शीतल पाणी
3 नारळ + ताक
4 पित्तशामक
5 हलका आहार + कॉटन

Photo Credit: NDTV Marathi
थंड पाण्याने शरीर स्वच्छ करणे
दिवसातून तीन-चार वेळा तोंड, हात-पाय धुवा
शरीराचं तापमान लगेच कमी होतं
शीतल पाणी प्या
धने पाणी (धने उकळून)
जिरे पाणी रोज प्या
शरीरातील उष्णता कमी
(नक्की वाचा : Natural Shampoo For Hair Fall: केमिकलवाला शॅम्पू सोडा, केसांसाठी हे फळ वापरा! कोंडा, केसगळती होईल पटकन कमी)
नारळ पाणी + ताक
रोज नियमित घ्या
शरीर हायड्रेट ठेवतं दुर्गंधी आणि थकवा कमी
पित्तशामक द्रव्ये
गुलकंद Gulkand
शतावरी Shatavari
आवळा Amla
(नक्की वाचा : Summer Tips For Animals: उन्हाळ्याचा जनावरांच्या आरोग्यालाही फटका! विषबाधेची कारण, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या)
पित्त शांत करणारी द्रव्ये
आहार + कपडे
हलका, कमी तिखट कमी तेलकट आहार
कॉटनचे सैल कपडे वापरा
त्वचा श्वास घेईल उष्णता बाहेर
डॉक्टरांना कधी भेटावे?
सामान्यपेक्षा खूप जास्त घाम
रात्री झोपेतही घाम येतो
चक्कर, अशक्तपणा जाणवतो
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world