Winter Skin Care: थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी होऊ लागते. कोरड्या त्वचेच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स वापरतात आणि कित्येक घरगुती उपाय देखील करतात. यापैकीच एक उपाय म्हणजे नारळाचे तेल. नारळाच्या तेलास नॅचरल मॉइश्चरायझर मानलं जातं. म्हणूनच बहुतांश लोक हिवाळ्याच्या दिवसांत चेहऱ्यावर नारळाचे तेल लावणे पसंत करतात. पण हा उपाय योग्य आहे का? नारळाच्या तेलामुळे त्वचेला फायदे मिळतील की त्वचेचं नुकसान होईल? जाणून घेऊया तज्ज्ञांकडून माहिती...
नारळाच्या तेलाबाबत तज्ज्ञांचे काय म्हणणंय?
प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ जुशिया भाटिया सरीन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर कोरड्या त्वचेशी संबंधित माहिती सांगणारा व्हिडीओ शेअर केलाय. त्वचा कोरडी असेल तर नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. नारळाच्या तेलामुळे त्वचेवर एक थर तयार होतो, ज्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत मिळते. पण चेहऱ्यावर पिंपल्स असतील नारळाचे तेल वापरणे टाळण्याचाही सल्लाही डॉ. सरीन यांनी दिलाय.
(नक्की वाचा: Navel Oiling Benefits: रात्री झोपताना नाभीवर तेल लावल्यास काय होते? कोणते तेल वापरणं ठरेल सर्वाधिक फायद्याचं)
अन्यथा या नुकसानाचा करावा लागू शकतो सामना
डॉक्टर सरीन पुढे असंही म्हटलंय की, नारळाच्या तेलामुळे कधीकधी बॅक्टेरिअल फॉलिक्युलायटिसची समस्याही निर्माण होऊ शकते. म्हणजे तेल आणि घामाच्या ग्रंथी बंद झाल्यास त्याजागी बॅक्टेरिया वाढू लागतात. नारळाच्या तेलाने शरीराचा मसाज करणाऱ्या लोकांनाही हा संसर्गाचा सामना करावा लागू शकतो, अशीही माहिती काही अभ्यासामध्ये आढळून आलीय.
(नक्की वाचा: Hair Loss Remedies: केसगळतीमुळे हैराण? 1 चमचा तुपात हळद मिक्स करून लावल्यास काय होईल? जाणून घ्या 4 रामबाण उपाय)
काय करावा उपाय?
डॉक्टर सरीन यांनी सांगितलं की, त्वचा कोरडी झाली असल्यास थोड्या प्रमाणातच नारळाचे तेल लावावे. मुरुमांची समस्या असणाऱ्यांनी तेल लावणं टाळावे. तेल लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करणं आवश्यक आहे. मुरुमांची समस्या असल्यास नारळ तेलाऐवजी मॉइश्चरायझरचा वापर करावा. हल्ली बाजारामध्ये त्वचेच्या समस्यांनुसार कित्येक मॉइश्चरायझर उपलब्ध आहेत. मॉइश्चरायझरमध्ये अशा कित्येक घटकांचा समावेश असतो, जे त्वचा आतील बाजूनं दुरुस्त करतात. नारळाच्या तेलाच्या तुलनेत मॉइश्चरायझर त्वचेमध्ये योग्य प्रकारे प्रवेश करतं आणि त्वचेतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

