जाहिरात

Hair Growth Tips: 45 दिवस मास्क लावून तरुणाने मुलींप्रमाणे लांबसडक, काळेभोर आणि घनदाट केस मिळवले VIDEO VIRAL

Hair Growth Tips: घरच्या घरी तयार केलेला आयुर्वेदिक हेअर मास्क वापरल्यास केस काळेभोर, घनदाट आणि चमकदारही होती. आठ आठवड्यांमध्ये तुम्हाला केसांमध्ये चांगले बदल दिसतील.

Hair Growth Tips: 45 दिवस मास्क लावून तरुणाने मुलींप्रमाणे लांबसडक, काळेभोर आणि घनदाट केस मिळवले VIDEO VIRAL
"Ayurvedic Hair Mask: आठ आठवड्यांमध्ये केस काळेभोर आणि घनदाट होतील"
Prasanna Kumar Lucky

Hair Growth Tips: केस आणि त्वचा सुंदर असतील तर एखाद्या व्यक्तीतील आत्मविश्वास आपोआप वाढतो, हे तुम्ही अनुभवलं असलेच. पण आताचे धावपळीचे जीवन, तणाव, प्रदूषण आणि केमिकलयुक्त प्रोडक्टच्या वापरामुळे केसांचे प्रचंड नुकसान होतंय. केसगळती, अकाली केस पांढरे होणे, केस पातळ होणे यासारख्या समस्यांमुळे कित्येक लोक त्रासले आहेत. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक महागडे उपायही करतात, पण यामुळे दीर्घकाळासाठी फायदा होत नाही. 

Latest and Breaking News on NDTV

म्हणूनच आता लोक आयुर्वेदिक औषधोपचारांची मदत घेताना दिसत आहेत. सोशल मीडियावरही हेअर मास्कचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. प्रसन्न कुमार लकी नावाच्या युजरने सोशल मीडियावर हेअर मास्कचा व्हिडीओ शेअर केलाय. हा उपाय केल्यास केवळ आठ आठवड्यांमध्ये केसांमध्ये तुम्हाला सकारात बदल दिसतील. 

स्पेशल हेअर मास्क कसे तयार करावे? (Hair Mask For 45 Days)

हेअर मास्क तयार करण्यासाठी लागणारी सामग्री

  • पाच-सहा जास्वंदाची ताजी फुले ( किंवा दोन चमचे पावडर)
  • मूठभर कढीपत्त्याची पाने (किंवा दोन चमचे पावडर)
  • एक-एक चमचा जटामांसी, भृंगराज आणि आवळा पावडर 
  • तीन-चार चमचे दही आणि कोरफड जेल
  • कोंडा आणि केस पातळ झाले असल्यास एक चमचा मेथीची पावडर  
  • जाडसर पेस्ट तयार करा आणि स्कॅल्पसह संपूर्ण केसांवर लावा.
  • 30–45 मिनिटांनंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या. 

आयुर्वेदिक हेअर मास्क (8 Weeks Challenge: Step by Step Results)

  • पहिल्या दोन आठवड्यांमध्ये स्कॅल्पची त्वचा डिटॉक्स होईल आणि कोंड्याची समस्या कमी होईल.
  • 3–4 आठवड्यांमध्ये केसांचे मूळ मजबूत होतील, केसगळती कमी होईल, केसांवर नैसर्गिक चमक येईल. 
  • 5–6 आठवड्यांमध्ये नवीन केस येतील, केस घनदाटही होतील. 
  • 7–8 आठवड्यांमध्ये केसांना नैसर्गिक काळा रंग मिळेल आणि केस पातळ होण्याची समस्याही दूर होईल.

हेअर मास्क लावण्यापूर्वी या गोष्टीही ठेवा लक्षात (Hair Growth Tips)

  • हेअर मास्क वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करुन पाहावी. 
  • स्कॅल्पची त्वचा कोरडी असेल तर हेअर पॅकमध्ये कोरफड जेल किंवा नारळाच्या तेलाचा समावेश करावा. 
  • स्कॅल्पची त्वचा तेलकट असेल तर आवळ्याची पावडर जास्त आणि दह्याचे प्रमाण कमी ठेवावे.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com