जाहिरात

Tata Sierra.EV Launch : बुकिंग सुरू! टाटाची जबदस्त कार, ड्रायव्हरशिवाय पार्किंग; अवघ्या 5.8 सेकंदात 100 चा वेग

Tata Motors 'Sierra' संपूर्ण नवीन इलेक्ट्रिक अवतारात सादर करण्यात आली आहे. ही कार जुन्या काळातील आठवणी आणि मॉर्डन जगातील अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचं एक जबरदस्त कॉम्बिनेशन आहे.

Tata Sierra.EV Launch : बुकिंग सुरू! टाटाची जबदस्त कार, ड्रायव्हरशिवाय पार्किंग; अवघ्या 5.8 सेकंदात 100 चा वेग
Tata Sierra.EV Launch
Photo Credit: X

Tata Motors 'Sierra' संपूर्ण नवीन इलेक्ट्रिक अवतारात सादर करण्यात आली आहे. ही कार जुन्या काळातील आठवणी आणि मॉर्डन जगातील अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचं एक जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. नवी Tata Sierra.EV चा बेस मॉडेलची किंमत १८.७९ लाख (एक्स शोरूम) पासून सुरू होते. या प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्हीसाठी आजपासून बुकिंग सुरू झालं असून डिलिव्हरी १५ जुलैपासून सुरू होईल.

बॅटरीचे दोन पर्याय...

Tata Sierra EV मध्ये ग्राहकांना दोन मोठे बॅटरी पॅकचे पर्याय देण्यात आले आहेत. जो एनर्जी डेन्सिटीच्या LFP HV टेक्निकवर आधारित आहे. याचा मोठा 75 kWh बॅटरी पॅक सिंगल चार्जवर 665 km च्या क्लेम्ड रेंज देतं. तर खऱ्या जगात हा सहज 500km हून अधिक प्रवास करू शकतो. तर याचा छोटा 63 kWh बॅटरी पॅक सिंगल चार्जवर 565 km च्या क्लेम्ड रेंडसह येतो. या गाडीला 120 kW, 7.2 kW आणि 3.3 kW च्या वेगवेगळ्या चार्जेससह चार्ज केला जाऊ शकतो. सोबतच यात V2V (व्हीकल-टू-व्हीकल) आणि V2L (व्हीकल-टू-लोड) चार्जिंगचा सपोर्टदेखील मिळतो.

ड्रायव्हरशिवाय कार धावणार....

टाटाने या कारमध्ये जबरदस्त एआय आणि ऑटोनॉमस फीचर्स दिले आहेत. यामध्ये तुम्हाला'e-valet' नावाचा ऑटोनॉमस पार्किंग फीचर आणि समन मोड मिळतो. याच्या मदतीने कार पार्किंगमध्येही ड्रायव्हरच्या मदतीशिवाय पार्क करता येऊ शकते. सुरक्षेसाठी या कारमध्ये ADAS Level 2 चे सर्व एडव्हान्स फीचर देण्यात आले आहेत, त्यामुळे महामार्गावर अपघात होण्याची शक्यता जवळजवळ नाहीशी होते.

नक्की वाचा - Tata iCNG Vs Maruti S CNG: टाटाच्या CNG कारचं मायलेज मारुतीहून कमी का असतं? मुद्द्यांनी समजून घ्या नेमकं कारणं

Tata Sierra EV ची गती...

वेग आवडणाऱ्यांना ही कार नक्कीच आवडेल. Tata Sierra EV अवघ्या 5.8 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग घेऊ शकते. यामध्ये डुअल इलेक्ट्रिक मोटर्सचा वापर करण्यात आला आहे. द्यात मागच्या बाजूला 175 kW (240 Nm टॉर्क) आणि पुढे 103 kW (164 Nm टॉर्क) ची मोटर लावण्यात आली आहे. ही कार ऑल-व्हील-ड्राइव (QWD) टेक्नोलॉजीसह आहे. जे विविध प्रकारचा रस्ता आणि बर्फाच्छिदित भागातही चांगली ग्रिप देते.

लग्जरी इंटीरियर आणि कलर ऑप्शन...

या प्रिमियम SUV चा इंटीरियल अत्यंत आलिशान आहे. कारच्या आत Dolby Atmos आणि Apple CarPlay सह JBL च्या प्रिमियम ब्लॅक स्पीकर्स देण्यात आले आहेत. ड्रायव्हरसाठी यात हेड-अप डिस्प्ले (HUD) चा सहभाग आहे. ज्यात स्टँडर्ड, इमसिव्ह, पर्सनल आणि स्नो सारखे विविध चार मोड्स आहेत. याशिवाय कारमध्ये एम्बियंट, लाइटिंग, व्हेटिंलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस चार्जर आणि एयर प्युरीफायरसारख्या फीचर्सचा समावेश आहे. ही गाडी ऋषिकेश रॅपिड्स, नैनीताल नोक्टर्न, प्रिस्टिन व्हाइट आणि अंडमान एडवेंचर सारख्या 7 सुंदर रंगांमध्ये उपलब्ध होईल.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com