जाहिरात

घरात उंदरांचा सुळसुळाट! टेन्शन घेऊच नका..फक्त 'या' फळाच्या सालीला कानाकोपऱ्यात ठेवा, एकही उंदीर दिसणार नाही

Tricks And Trick For Rat Repellent : घरात नीटनेटकेपणा आणि स्वच्छता असल्यावर रुममध्ये दुर्गंधी पसरत नाही. पण घरात उंदीर शिरल्यावर अनेठ ठिकाणी अस्वच्छता निर्माण होते. या एका ट्रिकमुळे घरातील सर्वच उंदीर पळून जातील.

घरात उंदरांचा सुळसुळाट! टेन्शन घेऊच नका..फक्त 'या' फळाच्या सालीला कानाकोपऱ्यात ठेवा, एकही उंदीर दिसणार नाही
Rat Repellent Tricks in Marathi
मुंबई:

Tricks And Trick For Rat Repellent : घरात नीटनेटकेपणा आणि स्वच्छता असल्यावर रुममध्ये दुर्गंधी पसरत नाही. पण घरात उंदीर शिरल्यावर अनेठ ठिकाणी अस्वच्छता निर्माण होते. इतकच नाही, तर रात्रीच्या झोपेच्या वेळी उंदीर पायाला चावण्याचीही शक्यता असते. पण फ्रिजमध्ये असलेल्या एका संत्र्याच्या सालीमुळे उंदरांचा सुळसुळाट कायमचा बंद होऊ शकतो. संत्र्यांच्या वासाने उंदीर लगेच पळून जातात. त्यामुळे उंदरांना घरातून पळवून लावण्यासाठी कोणत्याही केमिकल्सचा किंवा जाळीचा वापर करण्याची आवश्यकता नाहीय. त्यामुळे संत्र्याच्या सालीचा हा नैसर्गिक उपाय तुमच्या घराला सुरक्षित ठेऊ शकतो.

उंदरांना पळवण्यासाठी संत्र्याच्या सालीचा वापर कसा करायचा?

गरमीत किंवा थंडीत उंदीर घरात घुसतात. हे उंदीर छोट्या-छोट्या बिळांतूनही बाहेर येतात आणि घरात फिरतात. या उंदरांच्या समस्येपासून सुटका करायची असल्यास अनेक जण केमिकल आणि जाळीचा वापर करतात. आता तुम्ही एक नैसर्गिक उपाय करू शकता. संतऱ्याच्या सालीला घरातील कानाकोपऱ्यात ठेवल्यावर उंदीर पळून जातात. उंदरांना उग्र वास अजिबात सहन होत नाही. संतऱ्याच्या सालीत उग्र वास असतो. हा वास उंदरांना त्रासदायक ठरतो आणि ते घरातून धुम ठोकतात. दिवसभरात संत्र्याच्या साली बदलत राहा.

नक्की वाचा >> Big Boss 19 Video अशनूर कौरच्या अंडरआर्ममध्ये केस, अभिषेक बजाजने सर्वांसमोर उडवली खिल्ली! नेटकरी संतापले..

तो स्प्रे सुद्धा घरातील कोपऱ्यात मारू शकता

कारण जास्त या संत्र्याच्या साली जास्त वेळ ठेवल्यावर त्या सुकतात. त्यामुळे त्यांच्यातील सुगंध कमी होतो. जर तुम्हाला संत्र्याची साल पुन्हा पुन्हा बदलायला कंटाळा येत असेल, तर तुम्ही संत्र्याच्या साली उन्हात सुकवू शकता. त्यानंतर त्याची पावडर तयार करा. या पावडरला छोट्या पाऊचमध्ये ठेवून ते त्याच ठिकाणी ठेवा. तसच तुम्ही संत्र्याच्या सालीला पाण्यात उकळू शकता. या पाण्याला थंड करून एक स्प्रे बॉटलमध्ये भरा. या स्प्रेला दरवाजा आणि खिडक्यांजवळ मारा. स्प्रे मारण्याआधी त्या ठिकाणी आधी चेक करा की, त्या ठिकाणी इतर कोणत्या गोष्टीचा वास येतोय की नाही..

नक्की वाचा >> Instagram Video: ट्यूशनला न पाठवताच मुलांना कसं शिकवाल? या 5 गोष्टी रोजच करा, क्लासमध्ये मुलं नेहमीच करतील टॉप

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com