- महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील झारवड बुद्रूक हे गाव हिवाळ्यात पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे
- झारवड गावाजवळील अप्पर वैतरणा धरणाचा परिसर युरोपियन देशांप्रमाणे आहे
- मुंबई आणि पुणेपासून एकशे तीस ते एकशे पन्नाश किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण आहे
Winter Tourist Places: हिवाळा हा पर्यटकाना हवा हवासा वाटणारा सिजन. या काळात मोठ्या संख्येने पर्यटक बाहेर फिरण्यासाठी निघतात. काही जणे विदेशात जातात तर काही जण देशातील थंड हवेच्या ठिकाणी जाण्यास प्राधान्य देतात. युरोपमध्ये जाणाऱ्यांची संख्या त्यात जास्त असते.तर काही जण काश्मीर किंवा शिमला मनालीची सैर करून येतात. पण तुम्हाला माहित आहे का? या पेक्षा ही सुंदर पर्यटन स्थळ आपल्या महाराष्ट्रात आहे. हे पर्यटन स्थळ स्वित्झर्लंडलाही विसरायला लावेल असचं म्हणावं लागेल. जर तुम्हाला युरोपला किंवा काश्मीरला जाण्याची संधी येत नसेल तर या पर्यटन स्थळाला नक्की भेट द्या. चला तर जाणून घेवून या हीडन पर्यटन स्थळाबद्दल.
हिवाळा सुरू झाला की पर्यटकांची पावले काश्मीर, मनाली, तर कुणाची महाबळेश्वर किंवा माथेरानकडे ही वळतात. मात्र, गर्दीपासून दूर आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले एक ठिकाण सध्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. ही पर्यटन स्थळ मुंबई पासून जवळ आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी जवळ असलेले 'झारवड बुद्रूक' हे गाव सध्या पर्यटकांना आकर्षीत करत आहे. तेथील अप्पर वैतरणा धरणाचा परिसर एखाद्या युरोपीय देशासारखा भासतो. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी हे एक आहे. येथील बॅकवॉटर आणि सह्याद्रीच्या रांगा पर्यटनासाठी उत्तम पर्याय ठरत आहेत.
निसर्गाचा अनमोल ठेवा या गावाला मिळाला आहे. झारवड गावाजवळ गेल्यावर तुम्हाला चारही बाजूंनी डोंगर आणि निळशार पाणी पाहायला मिळते. हिवाळ्यात येथील धुक्याची चादर आणि बोचरी थंडी पर्यटकांना भुरळ घालते. विशेष म्हणजे मुंबई, पुण्यापासून हे ठिकाण अगदी जवळ असून एका दिवसाच्या सहलीसाठी हे सर्वोत्तम डेस्टिनेशन आहे.स्वित्झर्लंडल किंवा युरोपातील गावं ही अशीच असतात. जगभरातून पर्यटक त्यामुळे तिथे जातात. पण तसचं गाव आपल्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे इथं फिरायला जाण्यास काही एक हरकत नाही.
इथं जायचं असेल तर अगदी सोपे आहे. मुंबईपासून हे अंतर साधारण 130 ते 150 किमी आहे. रेल्वेने प्रवास करायचा असल्यास इगतपुरी हे जवळचे स्टेशन आहे. तेथून टॅक्सी किंवा खाजगी वाहनाने 1 तासात धरणापर्यंत पोहोचता येते. स्वतःची गाडी असल्यास कसारा घाट ओलांडून इगतपुरीमार्गे घोटी-वैतरणा रस्त्याने येथे जाता येते. या ठिकाणी राहण्यासाठी होमस्टे आणि हॉटेल्सचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे इथं जावून पर्यटनाचा आनंद तुम्हाला ही घेता येईल. एक वेगळ्या दुनियेत आल्याचा फिल या गावात गेल्यावर होतो असं तिथे गेलेल पर्यटक सांगतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world