जाहिरात

Betel Leaves Benefits: दात घासण्यापूर्वी विड्याचे पान खाल्ल्यास काय होईल? माहिती वाचून म्हणाल OMG

Betel Leaves Benefits: हा एक असा साधा सोपा उपाय आहे, जो आरोग्याच्या अनेक समस्यांवर प्रभावी ठरतो.

Betel Leaves Benefits: दात घासण्यापूर्वी विड्याचे पान खाल्ल्यास काय होईल? माहिती वाचून म्हणाल OMG
मुंबई:

आपल्या घरात आणि आजूबाजूला अशा अनेक साध्या गोष्टी उपलब्ध असतात, ज्यांचे आरोग्यदायी फायदे आपल्याला माहितच नसतात. अशीच एक गोष्ट म्हणजे पान. जे केवळ जेवणानंतर खाण्यासाठी किंवा धार्मिक कार्यासाठी नाही, तर आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. विशेषतः सकाळी उठल्यावर तोंड न धुता (ब्रश करण्यापूर्वी) पान खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. हा एक असा साधा सोपा उपाय आहे, जो आरोग्याच्या अनेक समस्यांवर प्रभावी ठरतो.

नक्की वाचा: सुटलेले पोट लगेच जाईल आत, फॅट्स होतील कमी; सकाळी प्या हे आरोग्यवर्धक पाणी

तज्ज्ञांनी सांगितले फायदे

प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ डॉ. सलीम जैदी सांगतात की, पान हे पचनक्रियेसाठी एक नैसर्गिक वरदान आहे. जर तुम्हाला ॲसिडिटी, पोटात गॅस किंवा पोट फुगण्याचा त्रास होत असेल, तर पान खाणे एक सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय आहे. फक्त हे पान खाल्ल्याने तुम्हाला लगेच आराम मिळतो. यासोबतच, पान तुमच्या तोंडाच्या आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहे. त्यात असलेले अँटी-बॅक्टेरियल घटक तोंडातील दुर्गंधी आणि जंतूंना नष्ट करतात. याचा नियमित वापर केल्यास हिरड्या आणि दात आणखी मजबूत होतात. जुन्या काळात लोक पानाचा वापर नैसर्गिक टूथपेस्ट म्हणून करत असत, हे ऐकून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल.

तोंड न धुता विड्याचे पान खाल्ल्यास काय होईल ?

  • पचनशक्ती सुधारते: पानाचे सेवन पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. त्यामुळे तुम्हाला पोटात जड वाटणे, गॅस होणे किंवा ॲसिडिटीसारख्या समस्यांपासून लगेच आराम मिळतो.
  • तोंड आणि दात निरोगी राहतात: पानातील औषधी गुणधर्म तोंडातील हानिकारक बॅक्टेरियांचा नाश करतात, ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी आणि दातांच्या समस्या दूर होतात.
  • सर्दी-खोकल्यावर उपचार: पान हे सर्दी-खोकल्यावरही प्रभावी आहे. सर्दी झाल्यावर विड्याचे पान गरम करून छातीवर लावल्यास छातीतील कफ कमी होतो आणि श्वास घेणे सोपे जाते. हा एक सोपा आणि खात्रीशीर उपाय आहे.

नक्की वाचा: बदाम-अक्रोड किती तास भिजवावे? कोणते ड्रायफ्रुट भिजवून खाल्ल्यास मिळतील फायदे

विड्याचे पान कसे खावे?

पान खात असताना एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. विड्याचे पान खाताना त्यात काहीही मिसळू नये. ऐरवी आपण पान खाताना त्यात सुपारी, कात, चुना आणि इतर गोष्टीही घालत असतो. तसं न करता फक्त पान खावं. सुपारीचा, चुना, कात यांचा अजिबात वापर करू नये.  सकाळी उठल्यावर दात घासण्यापूर्वी एक ताजे पान घ्या आणि ते व्यवस्थित चघळा. या सोप्या उपायामुळे तुमच्या आरोग्यात चांगला बदल दिसून येईल. हा उपाय अगदी साधा असला तरी त्याचे परिणाम मात्र खूप मोठे आहेत.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com