Better Sleep Tips In Summer: उन्हाळ्यात रात्री अंथरुणात पडल्यानंतरही जर उशीरापर्यंत झोप येत नसेल, अस्वस्थता जाणवत असेल आणि वारंवार कुस बदलावी लागत असेल तर यामागील मोठे कारण म्हणजे शरीर जास्त उष्ण असणे हे असू शकते. चांगली झोप येण्यासाठी केवळ थकवाच नव्हे तर शरीराचे तापमान कमी असणे आणि मन शांत होणेही तितकेच आवश्यक असते. ही बाब यासाठीही महत्त्वाची असते कारण झोप येण्यापूर्वी शरीराचे तापमान हळूहळू कमी होणे हाच झोप येण्याचा एक नैसर्गिक संकेत मानला जातो. अशा वेळेस झोपण्यापूर्वी फॉलो केलेले एक छोटेस कुलिंग रुटिनमुळे तुम्हाला चांगली झोप येऊ शकते.
झोपण्यापूर्वी Cooling Routine का गरजेचे आहे?
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, झोपण्यापूर्वी शरीराचे तापमान कमी होणे आवश्यक असते, तेव्हाच मेंदूला झोपेचे संकेत (स्लीप सिग्नल) मिळतात. जर खोलीचे तापमान खूप वाढलेले असेल किंवा शरीर थंड होऊ शकले नाही, तर झोप येण्यास अडचण निर्माण होऊ शकते.
1. कोमट पाण्याने आंघोळ करा किंवा हात-पाय धुऊन घ्या: अनेक जण थंड पाण्याने आंघोळ करणे फायद्याचं मानतात, पण कोमट पाण्यानं आंघोळ करणं अधिक प्रभावी ठरते. यामुळे शरीराचे तापमान आधी थोडं वाढतं आणि नंतर वेगाने कमी होतं, ज्यामुळे झोप लवकर येऊ शकते. जर आंघोळ करणे शक्य नसेल, तर फक्त हात-पाय आणि चेहरा धुतल्यासही खूप आराम मिळू शकतो.
2. थंड ओला टॉवेल वापरा : एक छोट्या आकाराचा टॉवेल हलका ओला करून काही मिनिटांसाठी फ्रीजरमध्ये ठेवा. त्यानंतर तो कपाळ, मान किंवा मनगटावर ठेवल्याने लगेचच गारवा जाणवू शकतो. हे शरीराचे “कुलिंग पॉइंट्स ” असतात, ज्याद्वारे शरीराला लवकर आराम मिळतो.
(नक्की वाचा: Natural Shampoo For Hair Fall: केमिकलवाला शॅम्पू सोडा, केसांसाठी हे फळ वापरा! कोंडा, केसगळती होईल पटकन कमी)
3. खोलीतील हवेचा प्रवाह (Airflow) वाढवा : जर खोली बंद राहिली तर उष्णता आणि कोंदटपणा वाढेल. झोपण्यापूर्वी दोन ते तीन मिनिटे खिडकी किंवा दरवाजा उघडा ठेवल्याने हवेचा प्रवाह सुधारतो आणि खोलीची हवा खेळती राहते. योग्य एअरफ्लो शरीर थंड होण्यास मदत मिळते.
4. झोपण्यापूर्वी मोबाइल वापरू नका: रात्री झोपण्यापूर्वी मोबाइल वापरल्यास मेंदू अॅक्टिव्ह मोडमध्ये राहतो. स्क्रीनच्या अतिरिक्त वापरामुळे मेलाटोनिन हार्मोनवरही परिणाम होतो. हे हार्मोन झोपेसाठी अतिशय आवश्यक आहे, म्हणूनच झोपण्याच्या किमान 20-30 मिनिटे आधी स्क्रीनपासून दूर राहणे कधीही उत्तम.
5. दोन मिनिटे दीर्घ श्वास घ्या (Deep Breathing) किंवा स्ट्रेचिंग करा : हलक्या स्वरुपात स्ट्रेचिंग आणि दीर्घ श्वास घेतल्यास शरीरासह मनालाही आराम मिळतो. यामुळे झोप येण्याची प्रक्रिया सोपी होते.
(नक्की वाचा: Summer Tips For Animals: उन्हाळ्याचा जनावरांच्या आरोग्यालाही फटका! विषबाधेची कारण, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या)

Photo Credit: NDTV Marathi
Cooling Routineमुळे शरीराला काय फायदा होतो?
- शरीराचे तापमान कमी होण्यास मदत मिळेल
- मन शांत होईल
- झोप लवकर येईल
- रात्री वारंवार जाग येण्याची समस्या कमी होईल
कारण शरीराचे तापमान कमी होणे हाच झोप येण्याचा सर्वात महत्त्वाचा संकेत मानला जातो. जर तुम्हालाही उन्हाळ्यात झोप येत नसेल, तर आज रात्रीपासूनच या पाच सोप्या टिप्स फॉलो करायला विसरू नका.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world