Sankashti Chaturthi 2026 Moon Rise Time: फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी आहे. संकष्ट चतुर्थीचे व्रत शुक्रवारी (6 मार्च) पाळले जाणार असून गणपती बाप्पाच्या पूजेसाठी हा दिवस अत्यंत मंगलदायी मानला जातो. संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्रोदयाला विशेष महत्त्व असते, कारण चंद्राला अर्घ्य देऊनच उपवास सोडला जातो. यंदा महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये रात्री 8.53 वाजेपासून ते रात्री 9.19 वाजेदरम्यान चंद्रोदय होणार आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पाच्या पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी मनोभावे गणपतीची पूजा आणि व्रत केल्यास जीवनातील संकटे दूर होऊन सुख-समृद्धी प्राप्त होते, असे म्हणतात.
संकष्टी चतुर्थी कधी आहे? शुभ मुहूर्त आणि तिथी काय? | Sankashti Chaturthi 2026 March Date And Shubh Muhurat
संकष्टी चतुर्थीची तिथी शुक्रवार (6 मार्च) संध्याकाळी 5.53 वाजता सुरू होणार असून शनिवारी (7 मार्च) संध्याकाळी 7.17 वाजता तिथी समाप्त होईल. संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्रोदयाच्या वेळेला विशेष महत्त्व दिले जाते, चंद्राचे दर्शन घेऊनच व्रताचे पारण केले जाते.
पुणे, मुंबई, कल्याणसह चंद्रोदयाची वेळ | Sankashti Chaturthi Moon Rise Time
- अकोला - रात्री 21:03 वाजता | Akola Moon Rise Time
- नागपूर - रात्री 20:55 वाजता | Nagpur Moon Rise Time
- अमरावती - रात्री 21:00 वाजता | Amravati Moon Rise Time
- नाशिक - रात्री 21:16 वाजता | Nashik Moon Rise Time
- अलिबाग - रात्री 21:18 वाजता | Alibag Moon Rise Time
- पंढरपूर - रात्री 21:07 वाजता | Pandharpur Moon Rise Time
- अहिल्यानगर - रात्री 21:11 वाजता | Ahilyanagar Moon Rise Time
- परभणी - रात्री 21:03 वाजता | Parbhani Moon Rise Time
- ओझर - रात्री 21:16 वाजता | Ozar Moon Rise Time
- पाली - रात्री 21:17 वाजता | Pali Moon Rise Time
- कल्याण - रात्री 21:18 वाजता | Kalyan Moon Rise Time
- पुणे - रात्री 21:14 वाजता | Pune Moon Rise Time
- कोल्हापूर - रात्री 21:11 वाजता | Kolhapur Moon Rise Time
- पुळे - रात्री 21:15 वाजता | Pule Moon Rise Time
- जळगाव - रात्री 21:09 वाजता | Jalgaon Moon Rise Time
- बीड - रात्री 21:06 वाजता | Beed Moon Rise Time
- जालना - रात्री 21:07 वाजता | Jalna Moon Rise Time
- बुलढाणा - रात्री 21:06 वाजता | Buldhana Moon Rise Time
- ठाणे - रात्री 21:18 वाजता | Thane Moon Rise Time
- भंडारा - रात्री 20:53 वाजता | Bhandara Moon Rise Time
- धाराशिव - रात्री 21:04 वाजता | Dharashiv Moon Rise Time
- भुसावळ - रात्री 21:09 वाजता | Bhusawal Moon Rise Time
- धुळे - रात्री 21:13 वाजता | Dhule Moon Rise Time
- महड - रात्री 21:17 वाजता | Mahad Moon Rise Time
- नांदेड - रात्री 21:00 वाजता | Nanded Moon Rise Time
- मुंबई - रात्री 21:19 वाजता | Mumbai Moon Rise Time
- मोरगाव - रात्री 21:12 वाजता | Morgaon Moon Rise Time
- यवतमाळ - रात्री 20:58 वाजता | Yavatmal Moon Rise Time
- रत्नागिरी - रात्री 21:15 वाजता | Ratnagiri Moon Rise Time
- रांजणगांव - रात्री 21:13 वाजता | Ranjangaon Moon Rise Time
- लातूर - रात्री 21:03 वाजता | Latur Moon Rise Time
- वर्धा - रात्री 20:57 वाजता | Wardha Moon Rise Time
- वेंगुर्ले - रात्री 21:12 वाजता | Vengurla Moon Rise Time
- छत्रपती संभाजीनगर - रात्री 21:09 वाजता | Chhatrapati Sambhajinagar Moon Rise Time
- सांगली - रात्री 21:09 वाजता | Sangli Moon Rise Time
- सातारा - रात्री 21:12 वाजता | Satara Moon Rise Time
- सावंतवाडी - रात्री 21:11 वाजता | Sawantwadi Moon Rise Time
- सिद्धटेक - रात्री 21:10 वाजता | Siddhatek Moon Rise Time
- सोलापूर - रात्री 21:05 वाजता | Solapur Moon Rise Time
- पहाटे उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे.
- यानंतर भगवान गणेशाचे स्मरण करून व्रताचा संकल्प करावा.
- पूजेसाठी घरातील मंदिरात किंवा एका स्वच्छ ठिकाणी चौरंग मांडावा, त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड अंथरावे. त्यावर गणपतीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा.
- पूजा सुरू करण्यापूर्वी ती जागा गंगाजलाने शुद्ध करून घ्यावी.
- त्यानंतर गणपतीला फुले, हार, कुंकू आणि दुर्वा अर्पण करा.
- गणपतीला मोदक किंवा लाडूंचा नैवेद्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
- यानंतर धूप आणि तुपाचा दिवा लावून गणेशाची पूजा करावी, श्रद्धेने मंत्रांचा जप करावा.
- पूजेनंतर संकष्टी चतुर्थीची व्रत कथा वाचणे किंवा ऐकणे शुभ मानले जाते.
- गणपतीची आरती करावी आणि चंद्रांचे दर्शन घेऊन व्रताचे पारण करावे.
- चंद्रोदयानंतर एका कलशात पाणी आणि थोडे दूध मिक्स करून अर्घ्य द्यावे.
- अक्षता, फुले आणि प्रसादही अर्पण करावा.
- यानंतर चंद्रदेव आणि भगवान गणेशाची आरती करावी.
- पूजा पूर्ण झाल्यावर प्रसाद ग्रहण करून उपवास सोडावा.
- पूर्ण श्रद्धेने संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास भगवान गणेशाची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात, असे म्हणतात.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world