Block Unwanted Calls: दैनंदिन जीवनात नको असलेले कॉल (Unwanted Calls) आणि स्पॅम मेसेज (Spam Messages) यामुळे अनेकदा नागरिक त्रस्त होतात. इतकेच नाही, तर काहीवेळा या स्पॅम कॉलमुळे युजर्स फसतात (Scam) आणि त्यांना आयुष्यभराची कमाई गमावण्याची वेळ येते. पण आता या त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी एक दिलासादायक मार्ग समोर आला आहे. काही सोप्या पायऱ्या (Steps) वापरून तुम्ही तुमच्या मोबाईल क्रमांकाला स्पॅम कॉल आणि मेसेजपासून सुरक्षित करू शकता.
टेलीमार्केटिंग (Telemarketing) कंपन्यांच्या सततच्या कॉल आणि मेसेजमुळे प्रत्येक मोबाईल युजर (Mobile User) हैराण झाला आहे. अनेकदा महत्त्वाचे काम सोडून आपण कॉल उचलतो आणि तो केवळ स्पॅम कॉल असल्याचे कळल्यावर त्रास वाढतो. या त्रासापासून वाचण्यासाठी एक सोपा उपाय आहे. तुम्ही फक्त एक मेसेज (SMS) पाठवून किंवा काही सोप्या पद्धतीने तुमचा नंबर 'डू नॉट डिस्टर्ब' (DND) रजिस्ट्रीमध्ये नोंदणीकृत (Register) करू शकता. एकदा नोंदणी झाल्यावर तुमच्या नंबरवर असे नको असलेले कॉल आणि मेसेज येणे बंद होतील.
Indian Railway: बोगदा आणि पुलावर ट्रेनचा वेग कमी का केला जातो? जाणून घ्या 5 कारणे
DND ॲक्टिव्हेट करण्याचे सोपे मार्ग: | How Block Unwanted Calls And Spam Message?
- सर्वप्रथम आपल्या मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडरच्या (Mobile Service Provider) वेबसाइटवर जा.
- तेथे DND (Do Not Disturb) सेक्शनमध्ये तुमचा नंबर नोंदवा.
- त्यानंतर आलेल्या OTP (One Time Password) एंटर करा.
- शेवटी प्रमोशनल कॉल्स आणि मेसेज ब्लॉक करण्याचा पर्याय निवडा.
- जर तुम्ही जिओ (Jio) युजर असाल, तर तुम्ही जिओ ॲपद्वारे (Jio App) देखील हे काम सहज करू शकता.
२. SMS ने ब्लॉक करण्याची पद्धत:
जर तुम्हाला वेबसाइट किंवा ॲपचा वापर न करता DND ॲक्टिव्हेट करायचे असेल, तर तुम्ही एसएमएसद्वारे (SMS) देखील हे काम करू शकता. यासाठी, तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 'START 0' असे लिहून १९०९ या क्रमांकावर पाठवा. या पद्धतीने DND ॲक्टिव्हेट केल्यानंतरही तुम्हाला स्पॅम किंवा मार्केटिंग कॉल येत असेल, तर तुम्ही त्या क्रमांकावर तक्रार नोंदवू शकता. त्यासाठी मेसेजमध्ये 'UCC', कॉलरचा नंबर आणि कॉलची तारीख/महिना लिहून १९०९ वर पाठवा. यामुळे त्या नंबरवरून येणारे नको असलेले कॉल आणि मेसेज ब्लॉक केले जातात.
एका दिवसात किती चपात्या खाऊ शकतो? याहून जास्त खात असाल तर आताच बदला ही सवय
३. फोन कॉलद्वारे ब्लॉक करण्याची सोपी पद्धत:
जर वेबसाइट किंवा एसएमएसद्वारे DND ॲक्टिव्हेट करणे कठीण वाटत असेल, तर तुम्ही थेट फोन कॉल करूनही हे करू शकता. यासाठी १९०९ या क्रमांकावर कॉल करा. कॉलवर दिलेल्या सूचनांचे (Instructions) पालन करा. ४काही मिनिटांतच तुमचा नंबर DND मध्ये नोंदणीकृत होईल आणि त्यानंतर स्पॅम कॉल आणि मेसेज येणे बंद होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world