जाहिरात

एका दिवसात किती चपात्या खाऊ शकतो? याहून जास्त खात असाल तर आताच बदला ही सवय

eka Divsat kiti Chapati Khau shakto: एका दिवसात किती पोळ्या खाऊ शकतो, याबाबत जाणून घेऊया.

एका दिवसात किती चपात्या खाऊ शकतो? याहून जास्त खात असाल तर आताच बदला ही सवय

eka Divsat kiti Chapati Khau shakto : चपाती आपल्या डाएटमधील असा भाग आहे ज्याशिवाय आपलं ताट अपूर्ण असतं. मग डाळ असो की भाजी. चपातीशिवाय पोट भरल्यासारखं वाटतच नाही. मात्र काहीजण एक एक करीत न मोजता चपाती खात सुटतात. मात्र एका दिवसात तुम्ही किती पोळ्या खायला हव्यात याचे काही नियम आहेत. आवश्यकतेपेक्षा जास्त पोळ्या किंवा चपाती खाणं शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकतं. एका दिवसात किती चपात्या खाऊ शकता? 

पोट कमी करण्यासाठी एका दिवसात किती चपात्या खाऊ शकता? | How Many Chapatis A Day Is Healthy?

जास्त पोळ्या खाण्यामुळे होणारे नुकसान...

वजन - पोळ्यांमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं. आवश्यकतेपेक्षा जास्त कार्बोहायड्रेटचं सेवन वजन वाढण्याचं कारण ठरू शकतं. वजन कमी करायचं असेल तर जास्त पोळ्या खाणं टाळा. 

रक्तातील साखर - आवश्यकतेपेक्षा जास्त गव्हाची पोळ्याचं सेवन केल्याने रक्तातील साखरेचा स्तर वाढू शकतो. जे मधुमेही रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकतो. 

पोट फुगणे - गव्हामध्ये ग्लुटन नावाचं प्रोटीन असतं. ज्यामुळे अनेकांना गॅस, पोट फुगणे, जडपणा सारख्या समस्या उद्भवू शकतात. रात्रीच्या वेळी जास्त पोळ्या खाल्ल्याने या समस्या वाढतात. 

बद्धकोष्ठता - जर तु्म्ही केवळ पोळ्यांवर अवलंबून असाल तर भाज्या, फळं यांचं सेवन पुरेशा प्रमाणात करा. शरीरात फायबरच्या कमतरतेमुळे पचनक्रिया मंद होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवू शकतो. 

एका दिवसात किती पोळ्या खाऊ शकतो? 

गव्हाच्या पिठाची एक पोळी तुमच्या शरीराला किमात १७ ग्रॅम कार्बोहायड्रेट मिळवून देते आणि साधारण ७० ग्रॅम कार्ब्स देतो. तज्ज्ञानुसार, एका दिवसात २ ते ३ पोळ्या खाऊ शकता. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com