जाहिरात

Water Melon: मधुमेहाच्या रुग्णांनी कलिंगड खावा की खाऊ नये? दिवसभरात किती प्रमाणात आणि कसे खावे कलिंगड? वाचा

Water Melon: मधुमेहाच्या रुग्णांनी कलिंगड खाल्ल्यास रक्तशर्करेवर परिणाम होतो का? कलिंगड खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या...

Water Melon: मधुमेहाच्या रुग्णांनी कलिंगड खावा की खाऊ नये? दिवसभरात किती प्रमाणात आणि कसे खावे कलिंगड? वाचा
"Water Melon Benefits: कलिंगड खाण्याचे फायदे"
Canva

Water Melon Benefits: उन्हाळ्यात कलिंगड (Water Melon) या फळाचं सर्वाधिक सेवन केलं जातं. या फळामुळे शरीर हायड्रेट राहते, मूड देखील सुधारतो. पण कलिंगड खावा की खाऊ नये, असा प्रश्न मधुमेहाची समस्या असणाऱ्या रुग्णांच्या मनात कायम असतो. कलिंगड खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढते, असे अनेकांना वाटतं. पण योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने कलिंगड खाल्ल्यास आरोग्यास नुकसान पोहोचत नाही.   

कलिंगडचे ग्लायसेमिक इंडेक्स किती आहे?

कलिंगडचे ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index) 70च्या आसपास मानला जातो, जो हाय कॅटेगरीमध्ये येतो. याचा अर्थ असा की यामुळे रक्तातील साखर वेगाने प्रभावित होऊ शकते. पण कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. याच कारणामुळे त्याचा ग्लायसेमिक लोड (Glycemic Load) कमी राहतो. म्हणजेच कमी प्रमाणात कलिंगड खाल्ल्यास त्याचा परिणाम मर्यादित असतो.

मधुमेहाचे रुग्ण कलिंगड खाऊ शकतात का?

तज्ज्ञांच्या मते मधुमेहाच्या रुग्णांनी कलिंगड खाणे पूर्णपणे बंद करण्याची आवश्यकता नाही. जर ते मर्यादित प्रमाणात खाल्ले तर शरीराला इजा होत नाही. त्यातील पाणी आणि काही प्रमाणात असलेले फायबर पचन सुधारण्यास मदत करतात. पण कलिंगडच्या सेवनावर नियंत्रण असणे अतिशय आवश्यक आहे.

(नक्की वाचा: 30 Days Salad Eating Benefits: सलग 30 दिवस सॅलेड खाल्ल्यास काय होते? आयुर्वेदिक तज्ज्ञांकडून जाणून घ्या फायदे आणि तोटे)

मधुमेहाच्या रुग्णाने दिवसातून किती प्रमाणात कलिंगड खावे?

डाएटिशियनच्या मते मधुमेहाचे रुग्ण दिवसातून सुमारे 100 ग्रॅम ते 120 ग्रॅम कलिंगड खाऊ शकतात. हे प्रमाण एका लहान वाटीएवढे असते. यापेक्षा जास्त खाल्ल्यास रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे प्रमाणाचे भान ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे.

(नक्की वाचा: Pudina Benefits: पुदिन्याचे सेवन करणं 9 लोकांसाठी ठरेल वरदान, उन्हाळ्यात पुदिना खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या)

कलिंगड खाण्याची योग्य पद्धत

  • कलिंगड नेहमी दिवसाच्या वेळी खाणे उत्तम असते.
  • कलिंगड कधीही रिकाम्या पोटी किंवा रात्री खाणे टाळावे.
  • जर कलिंगड प्रोटीन (Protein) किंवा फायबरयुक्त पदार्थांसोबत (उदा. नट्स किंवा सुका मेवा) खाल्ले तर त्याचा शरीरावर परिणाम अधिक चांगला होऊ शकतो.
  • कलिंगडचा रस (Juice) पिण्याऐवजी ते थेट फळ म्हणून खाणे जास्त फायदेशीर ठरते.
या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी

जर तुमच्या शरीरातील शुगर लेव्हल आधीच जास्त राहत असेल, तर कलिंगड खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देते. त्यामुळे तुमचा आहार तुमच्या आरोग्याच्या स्थितीनुसारच प्लॅन करा. संतुलित प्रमाण आणि योग्य वेळच तुम्हाला कलिंगड खाण्याचे खरे लाभ मिळवून देऊ शकते.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com