- हिंदू धर्मानुसार चंद्रग्रहणानंतर स्नान करून ग्रहणावेळी घातलेले कपडे बदलणे अत्यंत आवश्यक मानले जाते
- ग्रहणानंतर परिधान केलेले कपडे गरजू व्यक्तीला दान करणे किंवा स्वच्छ धुतल्याशिवाय वापर टाळणे आवश्यक आहे
- ग्रहणानंतर पवित्र नदीत स्नान करणे शक्य नसेल तर घरात गंगाजल मिसळून स्नान करावे
Chandra Grahan 2026: हिंदू धर्मात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या घटनांना अशुभ मानले जाते. या ग्रहणांच्या दुष्परिणामांपासून बचाव करण्यासाठी ज्योतिष आणि धर्मशास्त्रात अनेक नियम तसेच उपाय सांगितले गेले आहेत. वर्ष 2026मधील पहिले चंद्रग्रहण आज (3 मार्च 2026) फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला लागले. या ग्रहणाचे देशासह संपूर्ण जग आणि 12 राशींवर होणाऱ्या परिणामांबाबत अनेक ज्योतिषांनी मोठमोठ्या भविष्यवाणी केल्या आहेत. अशा परिस्थितीत या चंद्रग्रहणाशी संबंधित दोषांपासून मुक्तता मिळवण्यासाठी ग्रहण संपल्यानंतर नेमके काय करावे, असा प्रश्न तुम्हाला पडलाय का? तर जाणून घेऊया सविस्तर माहिती...
चंद्रग्रहण 2026 संपल्यानंतर कोणत्या गोष्टी कराव्या? ही 8 कामं नक्की करा | Chandra Grahan 2026 News
1. स्नान करणे
हिंदू मान्यतेनुसार चंद्रग्रहण संपल्यानंतर सर्वात आधी स्नान करावे. स्नान करताना ग्रहणावेळी घातलेले कपडे बदलले पाहिजे, कारण त्यामध्ये ग्रहणाची नकारात्मक ऊर्जा सामावलेली असते, असे म्हणतात.
2. वस्त्रांचे दान
शक्य असल्यास ग्रहणावेळी परिधान केलेले कपडे एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावे. जर दान करणे शक्य नसेल तर ते कपडे स्वच्छ धुतल्याशिवाय पुन्हा वापरण्याची चूक करू नका.
3. पवित्र नदीत स्नान
शक्य असल्यास चंद्र ग्रहणानंतर एखाद्या पवित्र नदी, सरोवर किंवा जलस्त्रोतामध्ये स्नान करावे. जर हे शक्य नसेल तर घरात स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून स्नान करावे.
4. ग्रहण रात्रीच्या वेळेस संपल्यास काय करावे?
जर चंद्रग्रहण रात्री उशीरा संपणार असेल तरीही स्नान करणे आवश्यक मानले जाते. जर काही कारणास्तव स्नान करणे शक्य नसेल, तर किमान स्वच्छ धुतलेले कपडे तरी परिधान करावे.

Photo Credit: PTI
5. चंद्र ग्रहाशी संबंधित वस्तूंचे दान
हिंदू धर्मात कोणताही दोष दूर करण्यासाठी दान हे अत्यंत फलदायी मानले जाते. चंद्रग्रहणानंतर चंद्र ग्रहाशी संबंधित वस्तू जसे की तांदूळ, साखर, पांढऱ्या रंगाचे कापड, चांदी इत्यादी गोष्टींचे आपल्या क्षमतेनुसार दान करावे.
(नक्की वाचा: Chandra Grahan 2026 LIVE: भारतात चंद्रग्रहणाला सुरुवात,महाराष्ट्रात कुठे व किती वेळ दिसणार ग्रहण? वाचा सविस्तर)
6. देवघराची शुद्धी
चंद्रग्रहण आणि सुतक काळ संपल्यानंतर शरीर तसेच मनाने पवित्र होऊन आपल्या देवघराची साफसफाई करावी. आपल्या आराध्य देवतेला गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने स्नान घालून त्यांची विधिवत पूजा करावी. संपूर्ण देवघरात गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करावे.
7. स्वयंपाकघराची स्वच्छता
देवघराप्रमाणेच ग्रहणाची नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आपले स्वयंपाकघर देखील स्वच्छ करावे.
8. भोजन
चंद्रग्रहण संपल्यानंतर ताजा स्वयंपाक तयार करून त्याचे सेवन करावे. जर ग्रहणापूर्वी तयार केलेल्या पदार्थांमध्ये तुळशीचे पान ठेवले असेल तर तरच त्याचे सेवन करावे, अन्यथा त्या खाद्यपदार्थांचे सेवन करणं टाळावे.
ग्रहणानंतर मोक्षस्नानाचा कालावधी काय आहे? | Lunar Eclipse 2026 Sutak Kaal Moksha Snan Rules
ग्रहणानंतरच्या मोक्षस्नानाबाबत पंचागकर्ते मोहन दाते (Mohan Date) यांनी सांगितले की, "सूर्यास्तापासून संध्याकाळी 6:48 वाजेपर्यंत ग्रहणाचा पर्वकाळ आहे. काही ठिकाणी अगदी थोडा वेळ पर्वकाळ असल्याने त्यांनी संध्याकाळी 6:48 वाजेनंतर फक्त मोक्षस्नान करावे. ज्यांना 15-20 मिनिटांपेक्षा अधिक पर्वकाळ मिळत आहे, ती मंडळी सूर्यास्तानंतर स्नान करून थोडा वेळ जप करून संध्याकाळी 6:48 वाजेनंतर मोक्षस्नान करू शकतात. त्यानंतर भोजन करावे".
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world