जाहिरात

Chandra Grahan 2026 First Photos: भारतात चंद्रग्रहण दिसले, Blood Moonचा पहिला फोटो समोर; तुम्ही पाहिला का?

Chandra Grahan 2026: भारतामध्ये पहिले चंद्रग्रहण दिसले आहे. कोलकात्यातून चंद्रग्रहणाचा पहिला फोटो समोर आलाय, तुम्ही पाहिला का ब्लड मूनचा (Blood Moon First Photo) पहिला फोटो?

Chandra Grahan 2026 First Photos: भारतात चंद्रग्रहण दिसले, Blood Moonचा पहिला फोटो समोर; तुम्ही पाहिला का?
"Chandra Grahan 2026 | Blood Moon 2026 First Photo: भारतातील चंद्रग्रहणाचा पहिला फोटो"
PTI
  • भारतात 3 मार्च 2026 रोजी पहिलं चंद्रग्रहण आंशिक स्वरूपात दिसून आले.
  • चंद्रग्रहणाचा पहिला फोटो आणि व्हिडीओ पाहिला का?
  • पुढील चंद्रग्रहण 31 मे 2026 रोजी असणार आहे.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Chandra Grahan 2026 | Blood Moon 2026 First Photo: वर्ष 2026मधील पहिलं चंद्रग्रहण आज (3 मार्च) भारताच्या अनेक भागांतून दिसले. या ग्रहणाचा पहिला फोटो देखील समोर आलाय. हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहण केवळ एक खगोलशास्त्रीय घटना म्हणून नव्हे तर धार्मिक दृष्टिकोनातूनही ग्रहणकाळ अत्यंत महत्त्वाचा मानला जाता. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मधोमध येते, पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, त्यावेळेस चंद्रग्रहण लागते. या काळात चंद्राचा रंग फिकट लाल किंवा तांब्यासारखा दिसतो, म्हणूनच यास 'ब्लड मून' (Blood Moon) असेही म्हटले जाते. यंदाच्या पहिल्या चंद्रग्रहणाचे भारतातील पहिले फोटो पाहुया...

वर्ष 2026मधील दुसरे चंद्रग्रहण कधी आहे? | Chandra Grahan 2026 May Month

पुढील चंद्रग्रहण 31 मे 2026 रोजी आहे. 

पूर्ण चंद्रग्रहण कुठे दिसेल? | Chandra Grahan 2026 News

नेहरू तारांगणातील वरिष्ठ शिक्षक ऋषभ जैन यांनी सांगितले की, हे वर्ष 2026 मधील पहिले चंद्रग्रहण आहे. साधारण दोन-तीन आठवड्यांपूर्वी सूर्यग्रहण झाले होते. जेव्हा-जेव्हा सूर्यग्रहण होते, तेव्हा त्यानंतर चंद्रग्रहण नक्कीच होते, असे मानले जाते. म्हणून आज 3 मार्चला चंद्रग्रहण लागले. या ग्रहणाचा 'पेनम्ब्रल फेज' (उपछाया भाग) साधारणतः दुपारी 2.15 वाजता सुरू झाला होता. भारतात गुवाहाटी, अरुणाचल प्रदेश, आयझॉल, मिझोरम यासारख्या काही भागांत आपण अंशतः (Partial) चंद्रग्रहण पाहू शकू, कारण तेथे सूर्य लवकर मावळतो आणि डोंगराळ भागांमुळे उंची जास्त आहे. पूर्ण चंद्रग्रहण जगाच्या पश्चिम भागात जसे की अमेरिका, अलास्का आणि इतर देशांमध्ये दिसेल.  

Latest and Breaking News on NDTV
कोलकात्यात दिसले चंद्रग्रहण | Kolkata Red Moon 2026

भारतात वर्षातील पहिले चंद्रग्रहण दिसले आहे. कोलकात्यामध्ये भारताचे पहिले चंद्रग्रहण पाहायला मिळाले, ज्यामुळे आकाशात लाल चंद्राचा प्रकाश पसरला होता. तुम्हीही पाहा पहिल्या चंद्रग्रहणाचे फोटो.

प्रयागराजमध्ये वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाची झलक

वर्षातील पहिले चंद्रग्रहण संपूर्ण देशात पाहिले गेले तसेच प्रयागराजमध्येही चंद्रग्रहणाची झलक पाहायला मिळाली. प्रयागराजमध्ये चंद्रग्रहण संध्याकाळी 6.08 मिनिटांनी सुरू झाले संध्याकाळी 6.46 वाजता समाप्त झाले. चंद्रोदय संध्याकाळी 6.34 वाजता झाला, जो आकाशात स्पष्टपणे दिसत होता.   

(नक्की वाचा: Chandra Grahan 2026: संध्याकाळी 6.47 वाजता चंद्रग्रहण संपल्यानंतर काय करावे? या 8 कामांसह मोक्षस्नानाचा नियम चुकवू नका)

चंद्रग्रहण संपल्यानंतर काय करावे? 
  1. चंद्रग्रहणानंतर स्नान करण्याचा सल्ला दिला जातो.
  2. चंद्र ग्रहण संपल्यानंतर गरजूंना दान करावे.
  3. देवघर आणि स्वयंपाकघरही स्वच्छ करावे.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com