Chandra Grahan 2026: धूलिवंदनाच्या दिवशी लागणाऱ्या चंद्रग्रहणाला ग्रस्तोदित का म्हटलंय जातंय? जाणून घ्या अर्थ

Chandra Grahan 2026: धूलिवंदनाच्या दिवशी यंदाचे पहिले चंद्रग्रहण लागणार आहे, पण या ग्रहणाला 'ग्रस्तोदित चंद्र ग्रहण' का म्हटलंय जातंय? ज्योतिषाचार्यांकडून याचा अर्थ जाणून घ्या...

जाहिरात
Read Time: 3 mins
"Chandra Grahan 2026: 'ग्रस्तोदित चंद्र ग्रहण' म्हणजे काय?"
Canva
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • ग्रस्तोदित चंद्रग्रहण म्हणजे ग्रहण लागलेले चंद्रबिंब उदयास येणे.
  • भारतात आज ग्रस्तोदय चंद्रग्रहण दिसणार आहे.
  • दुपारी 3.20 वाजेपासून ते संध्याकाळी 6.47 वाजेपर्यंत चंद्रग्रहण असणार आहे.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Chandra Grahan 2026: 3 मार्च 2026 रोजी होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धूलिवंदनाच्या दिवशी वर्षातील पहिले चंद्र ग्रहण लागणार आहे. हे एक पूर्ण चंद्र ग्रहण असेल आणि ते भारतातही दिसणार आहे. या ग्रहणाला 'ग्रस्तोदित चंद्र ग्रहण' असे म्हटले जात आहे. यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न आहे की, 'ग्रस्तोदित' या शब्दाचा नेमका अर्थ काय? ज्योतिषाचार्यांकडून याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

3 मार्च रोजीच्या चंद्रग्रहणाला 'ग्रस्तोदित चंद्र ग्रहण' का म्हटलं जातंय? | What Is Grastodit Chandra Grahan 2026

ज्योतिषाचार्य डॉ. गौरव कुमार दीक्षित यांनी 'एनडीटीव्ही'शी बातचीत करताना सांगितलं की, या चंद्रग्रहणाला 'ग्रस्तोदित' म्हणण्याचे कारण म्हणजे जेव्हा ग्रहणाची सुरुवात होईल, तेव्हा भारतात चंद्रोदय झालेला नसेल. सोप्या भाषेत सांगायचे तर ग्रहणाला आधीच सुरुवात झालेली असते पण आपल्या भारत देशामध्ये चंद्रोदय होईल तेव्हा ग्रहणाचा शेवटचा टप्पा सुरू असेल, अशा स्थितीला 'ग्रस्तोदित' म्हटले जाते. म्हणजेच ग्रहण लागलेले चंद्रबिंब उदयास येईल. 

चंद्रग्रहण कधी सुरू होणार? चंद्रग्रहण कधी समाप्त होणार? | Chandra Grahan 2026 Start And End Time

  • चंद्रग्रहणाची वेळ: ग्रस्तोदित चंद्रग्रहण दुपारी 3.20 वाजता सुरू होईल, पण त्यावेळेस भारतात चंद्रोदय झालेला नसेल. 
  • भारत देशातील स्थिती: भारतात चंद्रोदय संध्याकाळी साधारणतः 6.26 वाजेपासून ते 6.32 वाजेदरम्यान होईल. त्यावेळी ग्रहणाचा अंतिम टप्पा सुरू असेल.
  • चंद्रग्रहणाची समाप्ती वेळ: ग्रहण संध्याकाळी 6.46 वाजेपासून ते 6.47 वाजेदरम्यान संपेल. म्हणजेच भारत देशात हे ग्रहण फक्त 15 ते 20 मिनिटांसाठीच दिसेल.

सुतक काळ कधी सुरू होईल? | Chandra Grahan 2026 Sutak Kaal Time

चंद्रग्रहण भारतातही दिसणार असल्यामुळे सुतक काळ पाळला जाईल. सुतक काळ आज (3 मार्च) सकाळी 6.20 वाजता सुरू झालेला आहे. धार्मिक मान्यतेनुसार, सुतक काळात पूजा-अर्चना, मंदिरात प्रवेश आणि शुभ कार्ये करणे टाळले जाते.

(नक्की वाचा: Chandra Grahan 2026: धूलिवंदनाला दिसणार Blood Moon, चंद्रग्रहण कधी सुरू होणार? सुतक काळ,मोक्षस्नानाची वेळ वाचा)

ग्रहण काळात काय करावे? | Chandra Grahan 2026 Do's And Don'ts List
  • धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहण काळात ईश्वराचे नामस्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
  • तुम्ही 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करू शकता.
  • महामृत्युंजय मंत्राचा जप करणेही लाभदायक ठरते.
  • या काळात गीता, रामायण किंवा विष्णुसहस्रनामाचे पठण करणे उत्तम मानले जाते. 
  • ग्रहण काळात केलेल्या जप-तपाचे फळ अनेक पटींनी मिळते, अशी श्रद्धा आहे. 

(नक्की वाचा: Chandra Grahan 2026 Time: पुणे-मुंबईसह 35 जिल्ह्यांतील चंद्रग्रहणाची अचूक वेळ, सुतक काळ आणि नियम सविस्तर वाचा)

ग्रहण संपल्यानंतर काय करावे?
  • ग्रहण सुटल्यानंतर स्नान करावे. 
  • घरात गंगाजल शिंपडणे शुभ मानले जाते. 
  • देवांच्या मूर्तींना स्नान घालून पुन्हा पूजा करावी. त्यानंतर दानधर्म करणे खूप फलदायी मानले जाते. 
  • गरजू लोकांना अन्न, कपडे किंवा पैशांचे दान करणे शुभ मानले जाते.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)