जाहिरात

Chandra Grahan 2026: धूलिवंदनाला दिसणार Blood Moon, चंद्रग्रहण कधी सुरू होणार? सुतक काळ,मोक्षस्नानाची वेळ वाचा

Chandra Grahan 2026 Timing: चंद्रग्रहण कधी सुरू होणार आहे? चंद्रग्रहण कधी संपणार आहे? सुतक काळ, ग्रहणादरम्यान काय करावे आणि काय टाळावे? जाणून घ्या माहिती.

Chandra Grahan 2026: धूलिवंदनाला दिसणार Blood Moon, चंद्रग्रहण कधी सुरू होणार? सुतक काळ,मोक्षस्नानाची वेळ वाचा
"Chandra Grahan 2026 Timing: चंद्रग्रहण कधी सुरू होणार आहे?"
Canva

Chandra Grahan 2026 Timing: यंदाच्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण आज लागणार आहे. हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहण ही केवळ एक खगोलीय घटनाच नव्हे तर एक अतिशय महत्त्वाची धार्मिक घटना देखील मानली जाते. पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, त्यावेळेस ग्रहण लागते; असे म्हणतात. या काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढते, म्हणून विशेष काळजी घेणे आणि धार्मिक विधी करणे महत्त्वाचे मानले जाते. चंद्रग्रहणाची वेळ, सुतक कालावधी आणि काय करावे, काय टाळावे? याबाबत माहिती जाणून घेऊया...

चंद्रग्रहण कधी सुरू होणार? सुतक कालावधी? | Chandra Grahan 2026 Timings | Chandra Grahan 2026 Sutak Kaal  

पंचागकर्ते मोहन दाते (दाते पंचांग) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 मार्च 2026 रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण असून दुपारी 3:20 वाजता ग्रहण सुरू होत आहे, पण भारतात कोठेही या ग्रहणाचा आरंभ आणि मध्य दिसणार नाही. भारतात सर्वत्र हे ग्रहण ग्रस्तोदित स्वरुपाचे असणार आहे. म्हणजेच ग्रहण लागलेले चंद्रबिंब उदयास येईल. संध्याकाळी 6:48 वाजता ग्रहण मोक्ष होणार आहे, म्हणजेच ग्रहण संपेल. मंगळवारी (3 मार्च) सूर्योदयापासून वेधकाळ सुरू होत आहे. 

कोणी काळजी घ्यावी, काय करावे? | Chandra Grahan 2026 Do's And Don'ts List

आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, लहान मुले, म्हातारी माणसे यांनी सकाळी 11 वाजेपासून वेध पाळावे. वेधकाळात पौर्णिमेचा कुळधर्म, पूजा-अर्चा, अभिषेक करता येईल. देवाला नैवेद्य दाखवता येईल. वेधामध्ये पूजन निषेध नाही. आपणास भोजन निषेध असल्याने नैवेद्य अगदी थोडा करावा. आपण प्रसाद म्हणून अभिषेकाचे तीर्थ घेऊ शकता किंवा एक घास अन्नाचा फक्त वास घेऊ शकता. गुरुजी किंवा सुवासिनी यांना कोरडा शिधा आणि दक्षिणा देऊन कुळधर्म करता येईल. तसेच श्राद्ध देखील सपिंडक करता येईल, त्यावेळेस देखील श्राद्धाचा स्वयंपाक नैवेद्यापुरता करून नंतर तो गाईला द्यावा. ब्राह्मणास शिधा आणि दक्षिणा देणे. अशा प्रकारची कर्मे करता येत असल्याने 3 मार्च रोजी वेधकाळात धूलिवंदन (धुळवड), रंग खेळणे हे देखील करता येईल, असेही पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितलंय. 

(नक्की वाचा: Chandra Grahan 2026: चंद्रग्रहणात धुळवड खेळावी? काय टाळावे, वेधकाळ, उपाय जाणून घ्या दाते पंचांगानुसार माहिती)

मोक्षस्नान कधी करावे? | Chandra Grahan 2026 Mokshsnan 

मोक्षस्नानाबाबत पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले की, आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून संध्याकाळी 6:48 वाजेपर्यंत ग्रहणाचा पर्वकाल आहे. काही ठिकाणी अगदी थोडावेळ पर्वकाल असल्याने त्यांनी संध्याकाळी 6:48 वाजेनंतर फक्त मोक्षस्नान करावे. ज्यांना 15-20 मिनिटांपेक्षा अधिक पर्वकाळ मिळत आहे, त्यांना सूर्यास्तानंतर स्नान करून थोडावेळ जप करून संध्याकाळी 6:48 वाजेनंतर मोक्षस्नान करता येईल. त्यानंतर भोजन करता येईल.

कोणत्या राशीच्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी? | Chandra Grahan 2026 Horoscope 

  • ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन, तुळ, वृश्चिक, मीन या राशींना या ग्रहणाचे शुभफल मिळेल. 
  • मेष, कर्क, धनु, कुंभ या राशींना ग्रहणाचे मिश्रफल मिळेल. 
  • वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना ग्रहणाचे अनिष्ट फल मिळेल.

चंद्रग्रहण आणि धूलिवंदन एकाच दिवशी, पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली महत्त्वाची माहिती VIDEO

(नक्की वाचा: Chandra Grahan 2026 Time: पुणे-मुंबईसह 35 जिल्ह्यांतील चंद्रग्रहणाची अचूक वेळ, सुतक काळ आणि नियम सविस्तर वाचा)

चंद्रग्रहण कुठे-कुठे दिसणार? | Chandra Grahan 2026

ग्रहण दिसणारे प्रदेश - भारतासह पूर्व आशिया, जपान,रशियाचा मध्य व पूर्व प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संपूर्ण अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिकाचा काही प्रदेश या भागात हे ग्रहण दिसेल.

  • सुतक काळ सकाळी 6.20 वाजता सुरू झाला आहे.
  • चंद्रग्रहण दुपारी 3.20 वाजता सुरू होईल.
  • चंद्रग्रहण संध्याकाळी 6.48 वाजता संपेल.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com