जाहिरात
This Article is From Apr 02, 2025

Chhatrapati Shivaji Maharaj Death Anniversary 2025: छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार तुमच्या जीवनात घडवतील बदल

Chhatrapati Shivaji Maharaj Death Anniversary 2025: छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरणादायी विचार जाणून घेऊया...

Chhatrapati Shivaji Maharaj Death Anniversary 2025: छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार तुमच्या जीवनात घडवतील बदल
Chhatrapati Shivaji Maharaj Death Anniversary 2025: शिवरायांचे प्रेरणादायी विचार
Canva

Chhatrapati Shivaji Maharaj Death Anniversary 2025: देशाचे शूरवीर योद्धा छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची 3 एप्रिलला  (तारखेप्रमाणे) पुण्यतिथी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला होता. कित्येक वर्ष त्यांनी औरंगजेबच्या मुघल साम्राज्याविरोधात संघर्ष केला. शिवरायांचे शौर्य आणि पराक्रमाचे किस्से जगभरात प्रसिद्ध आहेत. शिवाजी महाराजांचे विचार आजही कित्येकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्यास मदत करतात. शिवबांचे काही प्रेरणादायी विचार जाणून घेऊया..

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार (Chhatrapati Shivaji Maharaj Quotes)

1. "एक छोटेसे पाऊल छोट्या ध्येयाकडे, यानंतर तुम्हाला मोठे ध्येय साध्य करण्यास मदत करू शकते."
2. "जेव्हा धाडस मोठे असते तेव्हा डोंगर देखील मातीच्या ढिगाऱ्याप्रमाणे भासू लागतो."
3. "एखाद्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास असेल तर तो आपल्या धाडसाने संपूर्ण जगावर विजयी पताका फडकवू शकतो."
4. "शत्रूला कमकुवत समजू नका, तसेच तो खूप बलवान आहे,असे समजून घाबरूही नका."
5. "जेव्हा लक्ष्य जिंकण्याचे असते तेव्हा कितीही परिश्रम असो किंवा कोणतीही किंमत असो ती मोजावीच लागते."

(नक्की वाचा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांना मिळायचा पगार आणि बोनस, दिवसही निवडला होता खास)

6. "जो माणूस काळाच्या दुष्टचक्रातही आपल्या कामाप्रति समर्पित असतो, त्याच्यासाठी वेळ स्वतः बदलते."
7. "कोणतंही कार्य करण्यापूर्वी त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करणे फायदेशीर असते, कारण भावी पिढ्याही त्याचेच अनुकरण करतात." 
8. "शत्रू कितीही बलाढ्य असो त्याला आपल्या दृढनिश्चय आणि उत्साहाने पराभूत केले जाऊ शकते."
9. "स्वातंत्र्य हे एक वरदान आहे, जे प्रत्येकाला मिळण्याचा अधिकार आहे."
10. "एक यशस्वी माणूस आपल्या कर्तव्याची पराकाष्ठा करण्यासाठी योग्य मानव जातीच्या आव्हानांचा स्वीकार करतो."

(Chhatrapati Shivaji Maharaj: अफजल खानाचा वध ते 18 वरून 260 किल्ल्यांचे स्वराज्य; शिवरायांची शौर्यगाथा)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com