Mental Health Tips: आजच्या धकाधकीच्या आणि डिजिटल युगात आपण आनंदाचा शोध बाह्य जगात, विशेषतः मोबाइलच्या स्क्रीनमध्ये शोधत असतो. पण खरा आनंद हा आपल्या मेंदूतील रासायनिक बदलांवर अवलंबून असतो. प्रसिद्ध डॉक्टर रुचा पै यांच्या मते, मेंदूला उत्साही आणि आनंदी ठेवण्यासाठी महागड्या साधनांची नव्हे, तर शरीरातील चार नैसर्गिक हार्मोन्स संतुलित ठेवण्याची गरज असते. ते हार्मोन्स म्हणजे - डोपामिन, ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन आणि एंडॉर्फिन. आपल्या दैनंदिन जीवनातील साध्या वाटणाऱ्या कृती, जसे की सकाळी उठल्यावर स्वतःचा पलंग नीट करणे, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे किंवा प्रियजनांना मिठी मारणे, यातून या हॅपी हार्मोन्सची निर्मिती होते. जेव्हा आपण मोबाइलचा अतिवापर टाळून प्रत्यक्ष कृतीवर भर देतो, तेव्हा मेंदूला अचिव्हमेंट सिग्नल मिळतो, ज्यामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत मिळते. स्वतःला आतून आनंदी ठेवण्यासाठी या नैसर्गिक मार्गांचा अवलंब करणे हाच खऱ्या अर्थाने मानसिक स्वास्थ्याचा पाया आहे. जाणून घेऊया डॉक्टर रुचा पै यांनी दिलेली माहिती सविस्तर...
मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी टिप्स | Mental Health Tips
मेंदू आनंदी ठेवायचा आहे? मोबाइल नाही...
हे चार नैसर्गिक हार्मोन्स वाढवा
डोपामिन | ऑक्सिटोसिन | सेरेटोनिन | एंडॉर्फिन
(नक्की वाचा: Constipation: सकाळी काही मिनिटांत पोट होईल स्वच्छ, फक्त 1 मिनिट करा हे काम; योगाचार्यांनी सांगितली सोपी पद्धत)
डोपामिन वाढवण्यासाठी काय करावे?
- सकाळी उठून पलंग नीट करा
- दिवसाची Do Do List लिहा
- 15 मिनिटे एकाग्रतेने काम करा
- मोबाइलशिवाय जेवण करा
- पुस्तक वाचा
- यामुळे मेंदूला Achievement Signal मिळतो
- कुटुंबासोबत वेळ घालवा
- मनापासून कौतुक करा
- एखाद्याला मदत करा
- मिठी द्या
- मनातील भावना व्यक्त करा
- सकाळचा सूर्यप्रकाश घ्यावा
- निसर्गात चालायला जावे
- बागकाम करावे
- सूर्यास्त बघा
- ध्यान करावे
- यामुळे मन शांत आणि स्थिर राहते
एंडॉर्फिन वाढवण्यासाठी काय करावे?
- व्यायाम करा
- नाचा
- धावायला जा
- योग - स्ट्रेचिंग करा
- खेळ खेळा
पाहा पोस्ट
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world