
What to wear on Diwali 2025: दिवाळीचा दुसरा दिवस लक्ष्मीपूजनाचा असतो. या दिवशी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, पूजेदरम्यान वस्त्रांचं विशेष महत्त्व असतं. देवीची कृपा तुमच्यावर राहावी यासाठी वस्त्रांच्या रंगाला महत्त्व देण्यात आलं आहे. अशात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशेष रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जातात. यामुळे देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहते. आज आम्ही तुम्हाला दीपावलीच्या पूजेदरम्यान घालणाऱ्या कपड्यांच्या खास रंगांबाबत सांगणार आहोत. ज्यामुळे घरात सकारात्मकता आणि सुख-समृद्धी राहते.
पिवळ्या रंगाचं महत्त्व...
दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही लक्ष्मी पूजनात पिवळा आणि सोनेरी रंगाचे कपडे घालू शकता. धार्मिक मान्यतेनुसार, हा रंग लक्ष्मीला प्रिय असतो. यामुळे आयुष्यात प्रकाश, यश आणि लक्ष्मीचं आगमन होतं अशी मान्यता आहे.

लाल रंग
दिवाळीच्या लक्ष्मीपूजनावेळी तुम्ही लाल रंगाचे कपडे घालू शकता. या रंगाचा संबंध मंगळ ग्रहाशी होतो. महिलांबाबत सांगायचं झालं तर दिवाळीला त्या लाल रंगाची ओढणी घेऊ शकतात किंवा साडी नेसू शकतात. यामुळे आत्मविश्वास, शक्ती आणि सौभाग्य वाढतं.
पांढरा रंग
पांढऱ्या रंगाचा संबंध चंद्राशी असल्याचं मानलं जातं. याशिवाय हा रंग शांतता आणि पावित्र्याचं प्रतीक असतो. अशात तुम्ही दिवाळीला पांढऱ्या रंगाचे कपडे घालू शकता. जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचे कपडे नसतील किंवा काही कारणास्तव पांढरा रंग घालायचा नसेल तर तुम्ही क्रिम रंगाचे कपडे घालू शकता.

हिरवा रंग
ज्योतिषशास्त्रानुसार, हिरव्या रंगाचा संबंध बुध ग्रहाशी आहे. लक्ष्मी पुजनासाठी तुम्ही हिरव्या रंगाचे कपडे घालू शकता. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत आणि आयुष्यात नव्या संधी येतात.
कोणत्या रंगाचे कपडे घालणे टाळावे...
दिवाळीच्या दिवसात काळ्या रंगाचे कपडे घालू नये. काळा रंग नकारात्मकता, दु:ख आणि निराशाचं प्रतीक मानलं जातं. शुभ प्रसंगी कधीही काळ्या रंगाचे कपडे घालू नये. याशिवाय दिवाळीला फाटके, जुने कपडे घालणं टाळावं.
(NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world