- वजन कमी करण्यासाठी कार्बोदके पूर्णपणे बंद करण्याऐवजी अन्न खाण्याच्या पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे
- शरीरातील इन्सुलिन हार्मोन रक्तातील साखर नियंत्रणात ठेवून चरबी कमी करतो
- भात किंवा बटाटे शिजवून थंड करून पुन्हा गरम केल्यास रेझिस्टंट स्टार्च वाढतो, ज्यामुळे साखर नियंत्रित राहते
Weight Loss Tips: वजन कमी करायचे असेल तर भात, पोळी किंवा कार्बोदके (Carbs) पूर्णपणे बंद करावी लागतात, असा एक सर्वसाधारण समज आहे. मात्र, प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर सलीम यांनी हा समज खोडून काढला आहे. तुमच्या आहारात बदल करण्याऐवजी, अन्न खाण्याच्या पद्धतीत बदल करून तुम्ही दुप्पट वेगाने वजन कमी करू शकता, असा दावा त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत 'इन्सुलिन' या हार्मोन्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.
डॉक्टर सलीम यांच्या मते, शरीरात चरबी साठवण्यासाठी इन्सुलिन जबाबदार असते. जेव्हा आपण कार्बोदके खातो, तेव्हा रक्तातील साखर वाढते. ही साखर पेशींमध्ये ढकलण्याचे काम इन्सुलिन करते. शरीरात इन्सुलिनची पातळी जितकी जास्त असेल, तितकी चरबी जास्त साठते. त्यामुळे रक्तातील साखर स्थिर ठेवून इन्सुलिनची पातळी नैसर्गिकरित्या कमी ठेवणे, हाच वजन घटवण्याचा खरा मंत्र आहे.
डॉक्टरांनी 'कूक, कूल, रिहीट' ही पद्धत सुचवली आहे. भात किंवा बटाटे शिजवल्यानंतर ते लगेच न खाता फ्रिजमध्ये थंड करून पुन्हा गरम करून खाल्ल्यास त्यातील 'रेझिस्टंट स्टार्च' वाढतो. जो रक्तातील साखर वेगाने वाढू देत नाही. तसेच, जेवताना आधी फायबर (सॅलड), मग प्रोटीन आणि शेवटी कार्बोदके (पोळी-भात) खाण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
या 5 गोष्टी बदलतील तुमचे आयुष्य:
- 1. भात खाण्याची नवी पद्धत: भात सकाळी शिजवून फ्रिजमध्ये ठेवा आणि दुपारी किंवा रात्री गरम करून खा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
- 2. रात्रीचे जेवण: रात्री कार्बोदके टाळून सूप, डाळ किंवा पनीर यांसारख्या प्रथिनांवर भर द्या.
- 3. जेवणानंतरची शतपावली: जेवण झाल्यावर लगेच झोपण्याऐवजी 10-15 मिनिटे चालल्यामुळे शरीरातील साखर चरबीत रूपांतरित होत नाही.
- 4. 'नेकेड कार्ब्स' टाळा: नुसती पोळी किंवा ब्रेड खाण्याऐवजी त्यासोबत तूप, दही किंवा भाजी खा, जेणेकरून साखर वेगाने वाढणार नाही.
- 5. जेवणाचा क्रम: जेवताना सुरुवातीला 7-10 घास सॅलड किंवा भाजीचे खा, त्यानंतर प्रोटीन घ्या आणि शेवटी भात किंवा पोळी खा.
या साध्या बदलांमुळे शरीरातील फॅट बर्निंग प्रक्रिया वेगाने सुरू होते आणि तुम्ही घरबसल्या वजन कमी करू शकता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world