जाहिरात

Constipation: सकाळी काही मिनिटांत पोट होईल स्वच्छ, फक्त 1 मिनिट करा हे काम; योगाचार्यांनी सांगितली सोपी पद्धत

Yoga For Constipation Relief: सकाळी टॉयलेटमध्ये तास-न्-तास बसल्यानंतरही पोट स्वच्छ होत नाहीय का? जाणून घ्या पोट स्वच्छ होण्यासाठी एक मिनिटाचा उपाय.

Constipation: सकाळी काही मिनिटांत पोट होईल स्वच्छ, फक्त 1 मिनिट करा हे काम; योगाचार्यांनी सांगितली सोपी पद्धत
"Constipation Relief: पोट स्वच्छ कसे करावे? कोणता उपाय करावा?"
NDTV Marathi

Constipation Treatment: सकाळी उठल्यानंतर पोट स्वच्छ होत नाही, असे तुम्ही अनेकदा अनेकांना बोलताना ऐकलं असेल. पोट स्वच्छ नाही झालं तर संपूर्ण दिवस खराब जातो. पोट जड वाटते, गॅस, अ‍ॅसिडिटी आणि आंबट ढेकर येणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. पोट स्वच्छ न झाल्याने अस्वस्थता निर्माण होऊन कोणत्याही कामात मन लागत नाही. काही लोक तर तास-न्-तास टॉयलेटमध्ये बसून राहतात, पण तरीही त्यांचे पोट स्वच्छ होत नाही. जर तुम्हीही या समस्येचा सामना करत असाल, तर या लेखातील माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. योगाचार्य कुलदीप त्यागी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून पोट स्वच्छ करण्याचा सोपा मार्ग सांगितला आहे.

जेव्हा आपले पोट स्वच्छ होत नाही, तेव्हा शरीरात घाण (टॉक्सिन्स) जमा होऊ लागते. ही घाण रक्तामध्ये मिसळून चेहऱ्यावर पुरळ येणे, सुस्ती येणे आणि चिडचिड होणे यासारख्या समस्या निर्माण होण्यास कारणीभूत ठरते. अनेकदा तर असे होते की नाश्ता करताच काहींना पुन्हा टॉयलेटमध्ये पळावे लागते. योगाचार्यांच्या मते याचे उत्तर औषधांमध्ये नसून आपल्या बसण्याच्या आणि पाणी पिण्याच्या पद्धतीत दडलेले आहे.

(नक्की वाचा: Social Media Side Effects: तुमचा मेंदू थकतोय का? फोनमधील या गोष्टी ठरत आहेत घातक, धक्कादायक माहिती समोर)

येथे पाहा पोस्ट

पोट स्वच्छ करण्यासाठी सकाळी 1 मिनिट करा हे काम - Best Yoga For Constipation Relief

स्टेप 1- मलासनात बसून पाणी प्यावे 

योगाचार्य कुलदीप त्यागी सांगतात की, सकाळी सर्वात आधी तुम्ही मलासनात (Malasana) बसले पाहिजे.

  1. पद्धत: आपल्या दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवा आणि पाय गुडघ्यात मोडून पायांवर बसावे (जसे जुन्या काळात लोक शौचासाठी बसायचे) बसा. तुमचा पाठीचा कणा सरळ ठेवा.
  2. काय करावे: या स्थितीत बसून एक ग्लास कोमट पाणी हळूहळू प्यावे.
  3. फायदा: या स्थितीत बसल्यामुळे आपल्या आतड्यांवर दाब पडतो, ज्यामुळे मल खाली सरकू लागतो आणि दाब जाणवू लागतो.

स्टेप 2- त्रेयक ताडासन 

  1. पाणी प्यायल्यानंतर लगेच तुम्हाला शरीरात थोडी हालचाल निर्माण करावी लागेल. यासाठी 'त्रेयक ताडासन' सर्वात उत्तम आहे.
  2. पद्धत: सरळ उभे राहा. आपल्या दोन्ही हातांची बोटे एकमेकांत अडकवा आणि तळहात वरच्या बाजूला करून हात आकाशाच्या दिशेने न्या. 
  3. दीर्घ श्वास घेत पूर्ण शरीर वरच्या दिशेला ताणा (Stretch). जणू काही कोणीतरी तुम्हाला वरील बाजूने खेचत आहे असे समजा. 
  4. त्यानंतर श्वास सोडत सामान्य स्थितीत या.

(नक्की वाचा: Ayurvedic Beauty Oil: 3,000 वर्षे जुने केरळचं त्वचेचं सीक्रेट, Nalpamaradi Tailam का ठरतंय व्हायरल ब्युटी ऑइल? जाणून घ्या)

स्टेप 3- बॉडी ट्विस्टिंग 

शेवटच्या टप्प्यात तुम्हाला तुमची कंबर थोडी फिरवायची आहे, जेणेकरून पोटातील घाण बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळेल.

  1. पद्धत: उभे असतानाच एक हात खांद्यावर ठेवा आणि दुसरा हात पाठीमागे कमरेवर न्या. आता हळूहळू आपले शरीर मागच्या बाजूला फिरवा. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे.
  2. फायदा: या क्रियेमुळे तुमच्या पोटातील अवयवांना मसाज मिळतो, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची (Constipation) समस्या दूर होण्यास मदत मिळेल. 
Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com