Social Media Side Effects: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्याबरोबर फोन चेक करणे आणि रात्री झोपण्यापूर्वी फोन स्क्रीन स्क्रॉल करणे ही आता सवय झाली आहे. पण हे अॅप्स तुमच्या मेंदूवर काय परिणाम करत आहेत, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 नुसार,X आणि इन्स्टाग्राम यासारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मानसिक आरोग्यासाठी व्हॉट्सॲप आणि फेसबुकपेक्षा जास्त हानिकारक ठरत आहेत. हे अॅप्स युजर्सच्या मनात तुलना, तणाव आणि एकटेपणाची भावना वाढवतात. या रिपोर्टमुळे आता हा प्रश्न निर्माण झाला आहे की, नक्की कोणते अॅप आपल्या मेंदूला सर्वात जास्त थकवते आणि कसे?
1. इंस्टाग्राम आणि 'एक्स' (X) अधिक धोकादायक का मानले गेले?
रिपोर्टनुसार इन्स्टाग्राम आणि एक्सवरील कंटेंट अतिशय वेगाने बदलतो तसेच सतत अपडेट होत असतो. यामुळे युजरचे लक्ष एका गोष्टीवर जास्त वेळ टिकू शकत नाही.
- इंस्टाग्राम: येथे लोक आपले परफेक्ट आयुष्य दाखवतात, ज्यामुळे इतरांमध्ये न्यूनगंडाची भावना वाढते.
- एक्स (X): या प्लॅटफॉर्मवर नकारात्मक बातम्या, ट्रोलिंग आणि वादाचे वातावरण जास्त असते. यामुळे मानसिक थकवा आणि चिंता वाढते.
2. WhatsApp आणि Facebook थोड्या प्रमाणात चांगले का आहेत?
व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर होणारे संवाद हे अधिक खासगी (Personal) असतात.
- WhatsApp: तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांशी संवाद साधता, ज्यामुळे आपुलकी आणि कनेक्टेड असल्यासारखे वाटते.
- Facebook: येथे तुम्ही कुटुंब आणि मित्रांचे अपडेट्स पाहता, जे भावनिक संतुलन राखण्यास मदत करतात.
- जरी यांचा अतिवापर हानिकारक असला, तरी तुलनेने हे प्लॅटफॉर्म कमी घातक मानले गेले आहेत.
3. 'डूम-स्क्रॉलिंग'चा वाढता धोका
इन्स्टाग्राम आणि एक्सवर युजर्स अनेकदा न थांबता स्क्रोलिंग करत राहतात, ज्याला 'डूम-स्क्रॉलिंग' म्हटले जाते.
- यामुळे मेंदू सतत नवीन माहितीने ओव्हरलोड होतो.
- झोपेवर परिणाम होतो.
- फोकस आणि प्रॉडक्टिव्हिटी (कार्यक्षमता) कमी होते. ही सवय हळूहळू मानसिक थकवा आणि तणाव वाढवते.
(नक्की वाचा: Ayurvedic Beauty Oil: 3,000 वर्षे जुने केरळचं त्वचेचं सीक्रेट, Nalpamaradi Tailam का ठरतंय व्हायरल ब्युटी ऑइल? जाणून घ्या)
4. तुलना आणि व्हॅलिडेशनची ओढइन्स्टाग्राम प्रामुख्याने लाइक्स आणि फॉलोअर्सवर आधारित प्लॅटफॉर्म आहे. लोक आपल्या पोस्टची तुलना इतरांशी करतात.
- कमी लाइक्स मिळाल्यास आत्मविश्वास कमी होतो.
- इतरांचे आयुष्य पाहून स्वतःला कमी लेखू लागतात. ही डिजिटल तुलना मानसिक आरोग्याला हानी पोहोचवते.
(नक्की वाचा: नोकरदारांसाठी मोठी बातमी! 1 एप्रिलपासून बदलणार सॅलरी स्ट्रक्चर; पगारावर काय होणार परिणाम? वाचा सविस्तर)
या छुप्या धोक्यापासून कसे वाचायचे?मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी हे छोटे बदल नक्की करा
- सोशल मीडियाचा वापर दिवसातून एक-दोन तासांपर्यंत मर्यादित करा.
- झोपण्यापूर्वी फोनचा वापर टाळा.
- नकारात्मक कंटेंटपासून दूर राहा.
- ऑफलाइन गोष्टींना प्राधान्य द्या (उदाहरणार्थ चालणे, पुस्तक वाचणे).
- छोटे छोटे बदल मानसिक आरोग्य अधिक चांगले करू शकते.
इन्स्टाग्राम आणि 'एक्स' जेथे तुमच्या मेंदूला जास्त थकवतात, तेथे व्हॉट्सअॅप आणि फेसबुक इतर अॅप्सच्या तुलनेत अधिक संतुलित अनुभव देतात.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world