
Diwali Home Cleaning Tips: दिवाळी सण सुरू होण्यापूर्वी प्रत्येकजण संपूर्ण घराची साफसफाई करतात. घरातील पडद्यांपासून ते फर्नीचरपर्यंत सर्व गोष्टी स्वच्छ केल्या जातात. काही लोक सर्वात शेवटी घरातील देव्हारा स्वच्छ करतात. कधीकधी घाईघाईमध्ये देवी-देवतांच्या मूर्ती-फोटोप्रेम योग्य पद्धतीने स्वच्छ केल्या जात नाही. कधी काचेवर धूळ राहून जाते तर कधी देव्हाऱ्याच्या भिंतीवर तेल किंवा धुराचे डाग तसेच राहतात. मंदिर नवीन दिसेल, यासाठी नेमके काय करावे? तुम्हीही याचा विचार करताय का... तर सोप्या सात टिप्स फॉलो करा.
1. मायक्रोफायबर कापडाची मदत (Diwali Cleaning Tips)
सर्वप्रथम फ्रेमवर जमा झालेली धूळ स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापडाचा वापर करावा. हे कापड धूळ शोषून घेते आणि काचेवर कोणतेही परिणाम होत नाही. फोटोफ्रेम जोर देऊन रगडू नका, हे लक्षात ठेवा.
2. व्हिनेगर आणि पाणी (Temple Cleaning Hacks)
फोटो फ्रेमवर तेल किंवा धुराचे डाग असल्यास एक वाटी पाण्यामध्ये एक चमचा व्हिनेगर मिक्स करा. कापडाच्या मदतीने या पाण्याचा वापर करुन फ्रेम स्वच्छ करून घ्या. पण लाकडी किंवा धातूची फ्रेम असेल तर या पाण्याचा वापर करू नका.

3. ब्रश आणि कापूस
कधी-कधी फ्रेमच्या कोपऱ्यांमध्ये धूळ-घाण अडकून राहते. यासाठी जुन्या ब्रशचा किंवा कापसाच्या बोळ्याचा वापर करावा.
4. लाकडी फ्रेमसाठी तेलाचा वापर करावा
फ्रेम लाडकी असेल तर लिंबाचे तेल आणि ऑलिव्ह ऑइलचा वापर करावा. तेलाचे काही थेंब कापसाच्या मदतीने लाकडी फ्रेमवर लावा. यामुळे लाकडावर सुंदर चमक येईल.
5. देव्हाऱ्याची नियमित देखभाल करावी
देव्हाऱ्यामध्ये निमयित अगरबत्ती आणि दिवा प्रज्वलित केला जातो, त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी देव्हाऱ्यासह मूर्ती-फोटो स्वच्छ करा.
6. ग्लास क्लीनर
काच स्वच्छ करण्यासाठी ग्लास क्लीनरचा वापर करू शकता. पण स्प्रे थेट फोटोवर फवारू नये, कापडावर स्प्रे करावे आणि काच स्वच्छ करावी.
(नक्की वाचा: Simple Kandil Making Ideas for Diwali 2025: कंदील विकत घेण्याची गरजच पडणार नाही, 10 मिनिटांत तयार होईल; पाहा भन्नाट आयडिया)
7. शुभ दिनी देव्हारा स्वच्छ करावा (Diwali Cleaning Ideas)
हिंदू मान्यतेनुसार, सोमवार, गुरुवार किंवा शनिवारी देव्हाऱ्याची स्वच्छता करणे शुभ मानले जाते. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि सुखशांती प्रवेश करते, असे म्हणतात.
(नक्की वाचा: Lakshmi Puja 2025 Date And Time: लक्ष्मीपूजनाची खरी तारीख कोणती? 20 की 21 ऑक्टोबर? शुभ मुहूर्तही जाणून घ्या)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world